एकसष्टीपूर्ती अभिष्टचिंतन सोहळा ; एका दिलखुलास दिलदार व्यक्तिमत्व … मा.श्री. सुरेश आप्पा पळशीकर

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

समाजातील युवकांना भविष्याची दिशा दर्शविणारे
निरपेक्षपणे समाजाचे कार्य करणारे

शासकीय कंत्राटदार मा श्री.सुरेश आप्पा पळशीकर यांच्या एकसष्टीपूर्ती अभिष्टचिंतन सोहळा आकृती हॉटेल येथे साजरा आयोजित…‌ 

प्रतिनिधी/बाबाराव जरगेवाड
हिमायतनगर : जेव्हा हिमायतनगर शहरातील व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाबद्दल अंदाज बांधले जातात.तेव्हा आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही. सूरेश आण्णा हे एक असेच उमदे,दिलदार,दिलखुलास व्यक्तिमत्व आहेत.आज सूरेश आप्पा यांचा वाढदिवस आहे.यांची आज एवढी ओळख त्यांच्याबाबतीत पुरेशी नाही.तर समाजकारण आणि राजकारणात अशी एक त्यांची वेगळी ओळख आहे. सहज,सोप्या आणि विनोदी शैलीत त्यांना उत्तम संवाद कौशल्य अवगत आहे.

निगर्वी,प्रेमळ आणि अत्यंत आदराचे बोलणे.कोणत्याही प्रसंगात जिव्हाळा,आपलेपणा जपण्याची आणि समोरच्याला आधार देण्याचा त्यांचा स्वभावगुण विरळाच!

मनात कुणाबद्दलही आकस ,राग न धरता तितक्याच स्वच्छ मनाने हाक मारुन एवढे काय रागवायचे? असे उलट विचारुन नेहमीच्या खळाळत्या हास्याने समोरच्याला आपलेसे करणारे हे व्यक्तिमत्व आहे. सुरेश आप्पा पळशीकर सामाजिकपयोगी एखादी भुमिका घेताना त्याची मांडणी,त्यांच्या स्वभावातला स्पष्टवक्तेपणा आणि आंतरिक असणारी तळमळ दिसुन येते. आर्य वैश्य सामाजात आणि सांस्कृतिक क्षेत्रातील तरुणाला योग्य दिशा देणारे हे पहिले व्यक्तिमत्व आहे. सूरेश आप्पा यांच्या मध्ये एक छान दिलदार व गर्व नसलेला उत्तम अंग असलेला व्यक्ती स्वभाव दडलेला आहे आर्या वैश्य समाजासाठी अहोरात्र मेहनत करणारे.

आज 19 जानेवारी एक दिलदार व्यक्तिमत्त्व निस्वार्थी नेतृत्वाचा हिमायतनगर शहरातील दिलखुलास व्यक्तिमत्व…. समाजाच्या विकासात्मक कामासाठी सदैव तत्पर व अग्रेसर आसणारे आपल्या सर्वांचे चाहते,हिमायतनगर तालुक्यातील हजारो कामगारांना नोकरी देणारे व्यक्तिमत्त्व.

हिमायतनगर तालुक्यातील जेष्ठ शाशकिय गूतेदार असून देखील ते लहान मोठ्या सर्वांना आदराची वागणूक देऊन मान सन्मान ठेवणारे हसत मूख व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात.

      आर्या वैश्य समाजाचे हिमायतनगर तालुका अध्यक्ष श्री.सुरेश आप्पा पळशीकर हे अनेक वर्षापासून हिमायतनगर तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक कार्यक्रमात स्वतःहून सहभागी होत असतात,
विकासात्मक दृष्टी व समाजकार्याची जाण असणारे नेतृत्व….
समाजकारणात नेहमी सामाजिक बांधिलकीला धरून असते .ते कोणत्याही पदाची अपेक्षा न करता निस्वार्थी भावनेने समाज कार्य करत असतात.

आदरणीय मा.श्री सुरेश शंकरराव पळशीकर शासकीय गुत्तेदार हिमायतनगर

आज आपला वाढदिवस…. !आपल्या या जीवनच्या प्रवासात नेहमीच यशाचा सुगंध दरवळत राहो.या शुभकामनेसह…. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,आपणास उदंड आयुष्य लाभो वाढदिवसाच्या मनापासून मंगलमय शुभेच्छा,

शुभेच्छूक – पळशीकर ,व सर्व मित्र परिवार हिमायतनगर

Share This Article
error: Content is protected !!