नांदेड प्रतिनिधी/सुनील शिंदे
नांदेड – भारतातील पाहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या”क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले “यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रम शहरातील आयटीआय कॉर्नर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले पूर्णाकृती स्मारक येथे सावता परिषदेच्या वतीने संपन्न झाला. यावेळी सावता परिषद जिल्हाध्यक्ष गोरखनाथ राऊत हे बोलत होते.भारताचा सर्वोच्च नागरी असणाऱ्या भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने सावित्रीबाई फुले यांना सन्मानित करण्यात यावे.आज सावित्रीबाई यांचे योगदान देशासाठी व महिलांसाठी फार मोठे आहे. त्यांनी संपुर्ण जीवन महिलांना साठी व सामाजिक कार्यासाठी खर्च केले.परिणामी त्यांना अंगावर शेण, धोंडे, दगड, झेलावे लागले.स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून त्यांनी जीवन भर संघर्ष केला.आज महिलांना समाजात चांगले स्थान मिळाले आहे. परिणामी महिला भारताच्या सर्वोच्च पदावर काम करत असल्याचे आपल्याला पहावयास मिळते शिक्षकापासून ते राष्ट्रपती अशा सर्व पदावर आज महिला काम करत आहेत अशा अशा या महान समाज सुधारक स्त्री शिक्षणेच्या प्रणेत्या यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे,अशी मागणी यावेळी गोरखनाथ राऊत यांनी केली.या वेळी सावता परिषदेचे युवा जिल्हा उपाध्यक्ष सुनील शिंदे यांची दैनिक शब्द भूमी न्यूज च्या मराठवाडा विभागीय संपादक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सावता परिषद पदाधिकारी इत्यादी,आजी-माजी पक्षाचे पदाधिकारी विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, व माळी समाज बांधवांनी त्यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार केला. विविध मान्यवरांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी अभिवादन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मणराव जाधव माजी पंचायत समिती सभापती तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभाग प्रदेश सरचिटणीस यांच्यासह सोनाजी राऊत,सर डॉ.उपप्राचार्य लक्ष्मणराव शिंदे,समता परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष सखाराम मामा शितळे,रामचंद्र रासे साहेब,रामचंद्र राऊत,मारोती राऊत, इत्यादी सह सावता परिषदेचे महानगर अध्यक्ष बालाजी बनसोडे, युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत राऊत,युवा महानगराध्यक्ष संदीप झांबरे, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुनील शिंदे,जिल्हा सोशल मीडिया प्रमुख ज्ञानेश्वर गोरे इत्यादी सह माळी समाज बांधव व फुले दांपत्य प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर भाषणे केली व आपले विचार माडले.