उदगीर येथे सैनिकी विद्यालयात नांदेड जिल्हा प्रतिनिधी मारोती पुठ्ठेवाड यांचा सत्कार संपन्न…

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नायगाव ता.प्रतिनिधी अशोक वाघमारे

नायगाव – श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात न्युज नायगाव महाराष्ट्र के नाईन टी व्ही चॅनलचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी मारोती पुठ्ठेवाड यांचा सत्कार संपन्न झाला.

दि. 15 जानेवारी 2024 रोजी सेना दिन, महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन व शालेय वर्धापन दिनाचे औचित्य साधून वार्षिक स्नेहसंमेलन या कार्यक्रमाचे आयोजन सैनिकी विद्यालयात करण्यात आले होते.

या कार्यक्रमात नांदेड जिल्हा प्रतिनिधी व दैनिक लोकपत्र प्रतिनिधी व द जुर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघटन चे नांदेड जिल्हाध्यक्ष मारोती पुठ्ठेवाड यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बसवराज म पाटील नागराळकर यांच्या हस्ते करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ब्लड बँकेचे अध्यक्ष रमेशअण्णा अंबरखाने, सेवानिवृत्त समाज कल्याण आयुक्त दिनेश सास्तूरकर, प्रसिद्ध साहित्यिक रामदास केदार, लक्ष्मण बेंबडे हे उपस्थित होते.

 

पत्रकारिता या क्षेत्रात मारोती पुठ्ठेवाड यांचे कार्य उल्लेखनीय आहे. ते सतत आपल्या लेखनाच्या माध्यमातून समाजातील जनतेला न्याय देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

जिल्हा प्रतिनिधी पत्रकार मारोती पुठ्ठेवाड यांचा सत्कार झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन के नाईन महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक रामदास ताटे, करन ताटे , आकाश ताटे, दत्ता कांबळे, एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड , पत्रकार बांधव व इतर मान्यवरांनी केले आहे.

Share This Article
error: Content is protected !!