जिल्हा प्रतिनिधी नांदेड/
नांदेड – गोल्ला गोलेवार यादव समाजातील सावरखेड येथील 11 वर्षीय ऋषिकेश आपतवाड यांची 2017 ला अत्याचार करुन निर्घृण खून केला होता. सदरील निर्दयी घटनेमुळे सगळीकडे हळहळ वाटली होती. त्या हत्येच्या संतापजनक घटने नंतर सर्व महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यामुळें नांदेड जिल्ह्यातील गोल्ला गोलेवार यादव समाजाने नांदेड येथे व प्रत्येक तालुक्यात निषेधार्थ मोर्चा काढून आक्रोश व्यक्त केला होता. त्यावेळी पोलिस प्रशासनानेही गांभीर्य ओळखून आरोपी गिरीश गंगाराम कोल्हेवाड रा. मराठगल्ली मुदखेड याला अटक करुन जेरबंद केले व पो. स्टे. कुंटुर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरील विशेष खटला बाल संरक्षण कायद्याखाली न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्याच्या आधारे न्यायालयाचे न्यायाधीश दिनेश कोठलीकर यांनी 17 जानेवारी रोजी आरोपीला मरे पर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. हा बीलोली सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल होता.
सरकार तर्फे सरकारी अभियोक्ता संदीप कुंडलवाडीकर यांनी बाजू मांडली. या प्रकरणाचा तपास स पो नि. विवेकानंद पाटिल यांनी केला तर पोलिस जमादार पंडितराव ईजुलकंठे यांनी सहकार्य केले.
त्याबद्दल सर्वांचे केले तेवढे आभार कमीच आहेत परंतु न्याय देवतेने खरी श्रद्धांजली ऋषकेशला अर्पण केली व त्यांच्या कुटुंबियांना न्याय दिला. अशी भावना गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड भोसीकर यांनी व्यक्त केली.