हिंगोली जिल्हा प्रतिनिधी
हिंगोली – हिंगोली आणि माढा लोकसभा मतदारसंघातून धनगर समाजाला इंडिया आघाडीने उमेदवारी द्यावी यासाठी इंडिया आघाडीचे दिग्गज नेते माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा.शरद पवार यांची राष्ट्रीय युवा नेते ॲड.सचिन नाईक यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाने आज दि.१८ जानेवारी २०१४ बारामती येथे भेट घेतली.
मा.शरद पवार म्हणाले “इंडिया आघाडीने हिंगोली आणि माढा लोकसभा मतदारसंघातून धनगर समाजाला उमेदवारी द्यावी यासाठी मी खा.राहुल गांधी,खा.मल्लिकार्जुन खरगे,मा.उध्दवजी ठाकरे,मा.ॲड.प्रकाशजी आंबेडकर,मा.सिताराम येचुरी यांच्या सोबत चर्चा करून धनगर समाजाला राजकीय न्याय देणार.”
या शिष्टमंडळात मराठवाडा, विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र,खानदेश,कोंकण विभागातील धनगर समाजाचे नेते ॲड.हरिभाऊ शेळके,हेमंत पाटील,भास्करराव पंडागळे,जयाताई गोफणे,जग्गाभाऊ कोकरे,दादासाहेब काळे, रामभाऊ रूपनर,नानासाहेब वाघमोडे,ॲड.दिनेश पाटील,रावसाहेब रूपनवकर,बापूसाहेब सोलवनकर, डॉ. राजेश कोकरे, मोहन गोफणे, अमित पारेकर,आकाश मोरे,बळवंतराव नाईक, बाबूराव पोले,ॲड.बाळासाहेब नाईक,ॲड.रवि शिंदे,केशवराव नाईक, प्रा.साहेबराव देवकते,कानबाराव शिंदे, साहेबराव मस्के, बाळासाहेब माधवराव नाईक,अशोकराव मस्के,चेतन नरोटे, तुकाराम साठे,अशोक जामकर,बाबूराव शिंदे,बाजीराव मस्के, बाळासाहेब नाईक केदरगुडेकर, शिवाजी मस्के,दिगांबर साखरे,ॲड.दिलीप नाईक,शंकर ढाले,ॲड.प्रदीप पोले,प्रदीप नाईक,पंकज होडबे,प्रमोद वडकूते,आकाश कारगुडे,भारत पोले यांच्यासह मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते.