हिंगोली जिल्हा प्रतिनिधी
हिंगोली – कळमनुरी विधानसभा मतदारसंघ हा ओबीसींचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.या मतदारसंघात सन १९५२ पासून ते २०१९ पर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक ओबीसी जातीचे उमेदवार निवडून आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष *मा.शरद पवार*,शिवसेना पक्षप्रमुख *मा.उध्दवजी बाळासाहेब ठाकरे*, राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष *नानाजी पटोले* यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडी कडून कळमनुरी मतदारसंघांतून ओबीसी जातीलाच उमेदवारी द्यावी या मागणीसाठी कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील ओबीसी जातींचे एक शिष्टमंडळ ओबीसी जनमोर्चा हिंगोली जिल्हाध्यक्ष ॲड.रवि शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष *मा.शरद पवार*,शिवसेना पक्षप्रमुख *मा.उध्दवजी बाळासाहेब ठाकरे*, राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष *मा.नानाजी पटोले* यांना भेटण्यासाठी आज दि.१७ जानेवारी २०२४ रोजी कळमनुरी येथून मुंबईला रवाना झाले.
या शिष्टमंडळात ओबीसीचे नेते माजी पंचायत समिती सदस्य केशवराव मस्के मसोडकर,कानबाराव शिंदे पुयनेकर,अतुल वाघमारे वारंगेकर,प्रदीप मस्के चिंचोर्डीकर, पंकज होडबे सावळीकर,प्रमोद वडकूते जांभरूणकर,भारत पोले, आकाश कारगुडे आदी सहभागी.