मा.खा.भास्करराव पाटील खतगावकर यांच्या अध्यक्षते खाली नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीची विस्तारित कार्यकारणीची बेठक संपन्न

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – आज काँग्रेस पक्ष कार्यालय नांदेड येथे मा.खा.भास्करराव पाटील खतगावकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा कार्यकारणीची विस्तारित बैठक संपन्न झाली.

आगामी काळात राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेस पक्ष घरात घरात पोहचवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असा विश्वास आपल्या मनोगतातून डॉ.मीनल पाटील खतगावकर यांनी व्यक्त केला.

यात बूथ कमिटी,मंडळ कमिटी,तालुका व शहर कार्यकारणी पूर्ण करणे,विविध विभाग व सेलच्या जिल्हा कार्यकारणी व तालुका कार्यकारणी तयार करणे,नगर परिषद,नगर पंचायत,महानगर पंचायत मंडळ समिती व २९ जानेवारी २०२४ रोजी लातूर येथे होत असलेल्या विभागीय बैठक संदर्भात चर्चा व माहिती देण्यात आली.

काँग्रेस प्रणित विविध सेलच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी आमदार मोहन अण्णा हंबर्डे,माजी आमदार अमरनाथ राजूरकर,जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील शिंदे,दिलीप पाटील बेटमोगरेकर-माजी अध्यक्ष जिल्हा परिषद नांदेड,डॉ.श्रवण रॅपनवाड-प्रदेश सचिव,प्रफुल्ल सावंत-प्रदेश उपाध्यक्ष अ.जा.सेल,सुरेंद्र घोडजकर-प्रदेश सचिव,सौ.मंगाराणी अंबुलगेकर-माजी अध्यक्षा जिल्हा परिषद नांदेड,डॉ.गंगाधर सोनकांबळे-जिल्हाध्यक्ष सामजिक न्याय विभाग,कविता कळसकर जिल्हाध्यक्षा महिला काँग्रेस नांदेड,संजय देशमुख लहानकर-सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड,मनोहर पवार माजी जि.प.सदस्य नांदेड,डॉ.रेखा पाटील चव्हाण-प्रदेश उपाध्यक्षा महिला काँग्रेस,सुमती व्याहळकर,ललिता बोकारे,भगवानराव दंडवे तालुकाध्यक्ष भोकर,दत्तहारी पाटील चोळाखेकर तालुकाध्यक्ष-धर्माबाद,बालाजीराव गव्हाणे- तालुकाध्यक्ष अर्धापूर,बाळासाहेब देशमुख बारडकर-तालुकाध्यक्ष मुदखेड,संजय पाटील शेळगावकर,प्रल्हाद पाटील ढगे- तालुकाध्यक्ष उमरी,विठ्ठल पावडे- युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष,शिवाजी पाटील पाचपिंपळीकर-तालुकाध्यक्ष बिलोली,बालाजी पांडागळे- तालुकाध्यक्ष कंधार,शरद पवार- तालुकाध्यक्ष लोहा,नारायणराव श्रीमनवार,शशिकांत क्षीरसागर जिल्हाध्यक्ष-NSUI,करुणाताई जमदाडे,सतीश देवकत्ते,अशोक एडके,राजू गंदीगुडे,सादिक मरखेलकर,बाबाराव भाले,भाऊसाहेब कदम,सतीश बस्वदे,संतोष पुयड,जेसिका शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!