माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या हस्ते ,डॉ.ललिता शिंदे यांचा सत्कार.

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.२१.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या खंदे समर्थक व निकटवर्तीय समजले जाणाऱ्या सिडको हडको भागातील महिलांचं खंबीर नेतृत्व, एक अभ्यासू व

उच्चविद्याविभूषित व्यक्तिमत्व तथा काँग्रेस पक्षाच्या धडाडीच्या नेत्या नांदेड मनपाच्या माजी महीला व बालकल्याण समितीच्या उपसभापती, प्रसिद्ध साहित्यिक,लेखक,कवी, व सामाजिक कार्यकर्त्या म्हणून परिचित असलेल्या प्रा.डॉ. ललिता मुकुंद बोकारे (शिंदे) यांची त्याने केलेल्या आजवरच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले व महाराष्ट्र महिला प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सौ. सव्वालाखे यांच्या निर्देशानुसार

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष मा.आ.अमर राजूरकर यांनी नांदेड जिल्हा शहर महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी

प्रा.डॉ. ललिता मुकुंद बोकारे (शिंदे) यांची निवड करण्यात आली. सदरील निवडीबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण,भोकरच्या माजी आमदार सौ.अमिता भाभी चव्हाण यांनी दूरध्वनी करून शुभेच्छा दिल्या.तर नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी पक्ष कार्यालय नवा मोंढा नांदेड येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माजी खासदार तथा काँग्रेस पक्षाची ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांनी प्रा. डॉ.ललिता शिंदे बोकारे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

 

 

यावेळी मा.आ.अमर राजूरकर,नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे पाटील नागेलीकर,बाळासाहेब देशमुख बारडकर,मनोहर पाटील शिंदे,

काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष मीनलताई पाटील खतगावकर,महिला कांग्रेस जिल्हाध्यक्षा कविता कळसकर, डॉ. रेखाताई चव्हाण,सुमती व्याहालकर,छाया कळसकर.

सिडको ब्लॉक अध्यक्ष सतीश बसवदे,,गंगाधर सोनकांबळे, प्रफुल्ल कुमार सावंत, श्रीमनवार,देवडे..कल्याणकर आदी मान्यवर वं विविध फ्रंट चे पदाधिकारी उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!