योगेश काईतवाड यांनी नुकतीच एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याने गोला गोलेवार यादव समाज बांधवांच्या वतीने भव्य सत्कार…

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

हिमायतनगर ता.प्रतितीनी/बाबाराव जरगेवाड 
हिमायतनगर – तालुक्यातील श्रीक्षेत्र बोरगडी येथील पैलवान पी.एस.आय. दता काईतवाड यांचे चिरंजीव योगेश काईतवाड हे नुकत्याच झालेल्या महाराष्र्ट राज्य सेवा परीक्षा 2022 मध्ये घेण्यात आलेली लेखी ,तोंडी परीक्षा उतीर्ण होवून निवड यादी नुसार ते dysp किंवा कर आयुक्त या दोन्ही पदापैकी एका पदावर निवड होणार असल्याचे त्यांनी सांगीतले आहे. योगेश काईतवाड हा मॅक्यानिकल
ननइंजिनिअर आहे. तो मागील तिन वर्षा पासून घरीच तयारी करित होता. कोणत्याही कोचिंग क्लासेस शिवाय हे राज्य सेवा परीक्षा उतिर्ण झाला हे विशेष आहे . बोरगडी येथे छोट्या गावात 20/25 कर्मचारी आहेत. अख्ख गावचा शेती व्यावसाय आहे. जागृत हनुमान मंदीर असून येथे मोठ्या संख्येने भाविक येतात. येथील तरुण कुस्तीप्रेमी असून घरा घरातून कुस्तीच्या आखाड्यात मुले जिद्धी आणि चिकाटी ने तयारी करतात. आता शेतकरी व शेतमजूराची मुले स्पर्धा परीक्षेची तयारी करित आहेत. मागील वर्षी दोन मुले उच्च पदस्थ परीक्षा उतीर्ण झाले आहेत.योगेश काईतवाडचे वडिल पोलीस पदा पासून पी.एस.आय.झाले आपला मुलगा राज्य सेवा परीक्षा उतिर्ण होवून मोठा अधिकारी व्हावा यासाठी योगेशला घरीच सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. योगेशचे स्वप्न आय.पी.एस. किंवा आय.ए.एस होण्याचे आहे. योगेश काईतवाड यांचे एकंदरीत पूर्ण झाल्याचे दिसून आले आहे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत योगेश काईतवाड यांनी घवघवीत यश संपादन केल्याने हिमायतनगर येथे परमेश्वर मंदिर परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करून व बँड बाजा च्या गजरात स्वागत करण्यात आले.

गोला गोलावर यादव समाज हिमायतनगर संघटनेकडून भव्य सत्कार करण्यात आले आहे, यावेळी हिमायतनगर ता.अध्यक्ष सुभाषराव शिल्लेवाड, जिल्हाध्यक्ष कार्यध्यक्ष प्रकाशजी करेवाड,ता.उपध्यक्ष श्याम जकक्लवाड,ता.उपध्यक्ष राजेश्वर काईतवाड,ता.कार्यध्यक्ष पर्वतराव काईतवाड, युवक जिल्हाध्यक्ष नांदेड अभिषेक बकेवाड, साईनाथ निम्मेवाड,विठ्ठल देशमवाड, गंगाधर बासेवाड, नागोराव काईतवाड, बालाजी बकेवाड,संजू यटमवाड, अभिमन्यू काईतवाड, एकनाथ काईतवाड व सर्व समाजातील जेष्ठ मंडळी, याप्रसंगी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व गावातील नागरिक उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!