डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात घाणीचे साम्राज्य संबंधित मनपा प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल करा…बहुजन पॅंथर पक्ष पुष्पाताई गजभारे

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – नांदेड शहरातील शान असणारे महामानव क्रांतीसुर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील भूमिगत गटारे व नाल्या फुटून गेल्यामुळे त्यातील घाण व परिसरातील हॉटेल चालक त्यांच्या हॉटेल मधील घाण सांडपाणी उरलेले अन्न त्याच नाली मध्ये सोडत असल्यामुळे नाल्यातील पाणी रस्त्यावर साचून वाहत आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

त्या रस्त्याने ये जा करणाऱ्या जनतेला तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दररोज शेकडो लोक अभिवादन करण्यासाठी येतात तसेच फुटपाथ वर असणारे उघडे हॉटेल चालक फळ विक्रेते हे त्याच घाणी मध्ये विक्री करतात त्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात येत असून या गंभीर बाबीकडे स्वच्छता निरीक्षक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.

1 उघड्या नाल्यांमुळे पादचारी नाल्याच्या खड्ड्यांमध्ये पडून गंभीर घटना घडू शकते.
2 दाभड येथे जागतिक धम्म परिषद चालू आहे.

त्यानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देश विदेशातील प्रांतातील अनेक बहुजन समाज येत असताना परिस्थितीचा आढावा घेऊन स्वच्छता निरीक्षक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत असेच वाटते.
3 रस्त्याचे अर्धवट काम केले असल्यामुळे दररोज विजा करणाऱ्या पादचारी तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

4 हॉटेल व्यावसायिक व्यवसाय करीत असताना सार्वजनिक आरोग्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आहे.

त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
या सर्व बाबींचा विचार करून प्रशासनाने संबंधित स्वच्छता निरीक्षक तसेच हॉटेल चालकांवर कठोर कारवाई करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा परिसर स्वच्छ करून महामानवास घाणीपासून मुक्त करावे अन्यथा बहुजन कॅन्सर पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा बहुजन पँथर पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पुष्पाताई गजभारे यांनी निवेदनाद्वारे मनपा आयुक्त यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

यावेळी बहुजन पँथर पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय राक्षसे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जोंधळे, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल जोशी, विशाल सरोदे जिल्हा अध्यक्ष युवा आघाडी,रोहन गजभारे जिल्हा उपाध्यक्ष युवा आघाडी, प्रकाश कोल्हे संस्थापक अध्यक्ष डॉ.बी.आर.आंबेडकर,सुहास जोंधळे मुख्य संपादक नक्षत्र न्यूज चॅनल,जय कुंटे संपादक रणक्षेत्र न्यूज चॅनल तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.अशी माहिती संजय राक्षसे जिल्हाध्यक्ष बहुजन पॅंथर पक्ष नांदेड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

Share This Article
error: Content is protected !!