भागवत दशरथराव भुजबळे यांची डॉ.बी.आर.आंबेडकर प्रेस कौन्सिलच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – डॉ.बी.आर. आंबेडकर प्रेस कौन्सिलची एक महत्त्वाची बैठक दिनांक 25/01/2024 टायगर ग्रुप संघटनेच्या नांदेड येथील मध्यवर्ती कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीत भागवत दशरथराव भुजबळे यांची नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

ही बैठक डॉ. बी.आर.आंबेडकर प्रेस कौन्सिलचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यावेळी टायगर ग्रुप संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष पैलवान बाळासाहेब जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

यावेळेस पैलवान बाळासाहेब जाधव यांनी भागवत दशरथराव भुजबळे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला तसेच निवडीचे पत्र देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

या बैठकीस डॉ.बी.आर. आंबेडकर प्रेस कौन्सिल चे नांदेड जिल्हाध्यक्ष संजय राक्षसे, उपाध्यक्ष सुहास जोंधळे, सचिव विठ्ठल घाटे, उपसचिव जय कुंटे, कोषाध्यक्ष सुनिल जोशी तसेच सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.अशी माहिती सुनिल जोशी यांनी आमच्या प्रतिनिधीना दिली आहे.

Share This Article
error: Content is protected !!