माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि पोस्ट बेसिक जुनिअर कॉलेजच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न…..

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नायगाव ता प्रतिनिधी/अशोक वाघमारे.

नायगाव : तालुक्यातील मरोळी कांदा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि पोस्ट बेसिक जुनियर कॉलेजच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. नायगाव तालुक्यातील शिक्षण संस्था पैकी एक नामवंत शिक्षण म्हणून सुपरिचित आहे. आणि याच संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी उच्च पदावर बहुमान मिळवून शाळेचे नाव लौकिक केले आहे. म्हणून माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि पोस्ट बेसिक ज्युनिअर कॉलेजमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. यात छोट्या चिमुकलांचा डान्स व त्यांची कला उपस्थित कार्यक्रमाचे आकर्षक ठरली आहे. तर मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी कला सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली आणि यात प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेली कला व डान्स यांना वाव देऊन टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांना उत्साहीत केले.
सदर कार्यक्रमा दरम्यान बालक शिक्षण प्रसारित मंडळ शिक्षण संस्थेचे संचालक मा श्री रतन राठोड सर, संस्थेचे माजी मुख्याध्यापक श्री के आर राठोड सर, माननीय श्री डॉक्टर सिद्दिकी सर, भारतीय स्टेट बँकेचे मॅनेजर श्री अरोरा सर, यांनी सदर कार्यक्रमाचे उद्घाटन करून कार्यक्रमाला सुरुवात केली आहे. तर कार्यक्रमाला उपस्थित, श्री येवले सर, श्री बावणे सर,श्री शंकर राठोड सर, श्री कांबळे सर, संगीत विशारद श्री वाघमारे सर, श्री शर्मा सर, श्री बन सर, श्री जाधव सर, श्री सूर्यवंशी सर, व सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षक वर्ग आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. तर गावातील नागरिक उपस्थित राहून सदर कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला आहे.

Share This Article
error: Content is protected !!