ओबीसींची हिंगोली येथे १ फेब्रुवारी रोजी महत्त्वाची बैठक

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

 

हिंगोली जिल्हा प्रतिनिधी/

हिंगोली – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि.२६ जानेवारी २०२४ रोजी ओबीसींच्या विरूद्ध जी.आर.काढून मराठा समाजाचा ओबीसी मध्ये सरसगट समावेश केला.यामुळे मुळ ६५% ओबीसी समाजाचे शिक्षण-नौकरी-राजकारणातील अस्तित्व संपले आहे.महाराष्ट्र सरकारने त्वरित ओबीसी विरोधी काढलेला जी.आर.,न्यायमुर्ती संदिप शिंदे समिती आणि न्यायमूर्ती सुनिल शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मागासवर्ग आयोग बरखास्त करावा यासाठी हिंगोली जिल्ह्यात आंदोलन उभे करायचे आहे.
या करिता *ओबीसी जनमोर्चा च्यावतीने दि.१ फेब्रुवारी २०२४ गुरूवार रोजी सकाळी ११ वा शासकीय विश्रामगृह,हिंगोली* येथे महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे.या बैठकीला हिंगोली जिल्ह्यातील सर्व ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे हि नम्र विनंती

ॲड.रवि शिंदे जिल्हाध्यक्ष ओबीसी जनमोर्चा जि.हिंगोली

Share This Article
error: Content is protected !!