नायगाव ता प्रतिनिधी/अशोक वाघमारे.
नायगाव – तालुक्यातील मौजे राहेर येथे सकल मराठा समाज बांधवांनी गेले चार ते पाच महिन्यापासून सुरू असलेला संघर्ष आज मुंबईला जाऊन मोर्चा धडकल्याने राज्य सरकारने सकल मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याने राहेर येथे मराठा बांधवांच्या वतीने फटाक्याची अतिशबाजी व पेढे तोंडात भरून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांची गेल्या चार महिन्यापासून केलेले संघर्ष उपोषणे आंदोलने व मोर्चे यामुळे समाजाने मनोज जरांगे पाटील यांना दिलेला पाठिंबा व समाजाचे एक जुटी यामुळे आज मराठा समाजाला मोठे यश प्राप्त झाले असून या यशामुळे संपूर्ण राज्यातील सकल मराठा समाज बांधवांमध्ये मोठा आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या चार ते पाच महिन्यापासून राज्यातील मराठा समाज बांधवांनी घेतलेले अथक परिश्रम व साखळी मोर्चा आंदोलने उपोषणे यांची दखल घेऊन राज्य सरकारने मराठा समाजाच्या सकारात्मक विषयाकडे लक्ष वेधून मराठा समाजाच्या न्यायासाठी मोठा अध्यादेश काढण्यात आले आहे. यांचं मोठं श्रेय मनोज जरांगे पाटील यांना जात असून त्याचबरोबर सकल मराठा समाजाला देखील याचं श्रेय जाताना दिसून येत आहे कारण मराठा समाज आपल्या न्याय हक्कासाठी लढा दिला आणि भविष्यातील मुलाबाळांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी लढा उभारून न्याय मिळवून घेण्याचे मोठे काम केल्याने सर्वत्र श्रेयांचे भागीदार सकल मराठा समाज बांधव असल्याचे दिसून येत आहे. म्हणून राहेर येतील सकल मराठा समाज बांधवांनी राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या केलेल्या असल्यामुळे राज्यातील व ग्रामीण भागातील सर्व मराठा बांधवांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसून आले आहे या आनंद उत्सवामध्ये राहेर येथील प्रकाश पाटील हिवराळे प्रल्हाद पाटील इंगळे पप्पू पाटील जाधव गोविंद पाटील हिवराळे गंगाधर पाटील दतराम पाटील नागेश पाटील भगवान पाटील हिवराळे राजू पाटील दिगंबर पाटील अशोक पाटील यासह अदी सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.