नायगाव ता प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नायगाव – तालुक्यातील कुंटूर परिसरातील सांगवी ते मेळगाव परिसरातील शेती शिवारामध्ये 2019 ,2020 मध्ये अवैध उत्खननातुन जप्त करण्यात आलेल्या रेती साठा करण्यात आला होता . सदर रेती साठा 4931, ब्रास चा रेतीचा लिलाव महसूल कार्यालयामध्ये होणार असून सदर हा लिलाव 30 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयामध्ये होणार आहे. 600 रुपये प्रति ब्रास प्रमाणे रेतीचा लिलाव होणार आहे.ईछुक नागरिकांनी तरी इच्छुक गुत्तेदारांनी टेंडर भरण्यासाठी यावे व सदर रेती चा लिलाव करून सहाशे रुपये बरास प्रमाणे रेतीचा लिलाव होणार असून इच्छुक घरकुलधारक व टेंडर धारक यांनी रेतीचा लिलावात सहभागी होऊन रेती टेंडर भरण्यात यावे व सदर येथे साठा वापरण्यासाठी घेण्यात यावा अशे आव्हान नायगाव तहसीलदार मंजुषा भगत यांनी केले आहे. सदर रेती साठाची माहिती नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे.अशी माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाय एस देवकते यांनी दिली आहे.