व्ही पी के उद्योग समूहाच्या वतीने विक्रमी काम एकूण चार लाख मेट्रिक टन ऊस गाळप.

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नायगाव ता प्रतिनिधी/अशोक वाघमारे.

नायगाव – व्ही पी के उद्योग समूहाच्या वतीने चार लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाला असून एक विक्रम निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. यात व्हीपीके गुळ पावडर कारखाना, पर्यागनगर सिंधी, वागलवाडा येथील एम व्ही के साखर कारखाना, व डॉक्टर शंकरराव चव्हाण गुळ पावडर आदी तीन कारखाना अंतर्गत गळीप हंगाम 2023 ते 2024 जानेवारी अखेरपर्यंत चार लाख मॅट्रिक टन उसाचे गाळप यशस्वीरित्या केले असल्याची माहिती उद्योग समूहाचे चेअरमन तथा अध्यक्ष माननीय मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांनी दिली आहे. त्यामुळे सर्व संचालक,सभासद,खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी,ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूक ठेकेदार, व सर्व हितचिंतकांचे माननीय कवळे गुरुजी यांनी आभार मानत सर्वांना मनापासून शुभेच्छा दिल्या.
व्हीपीके उद्योग समूहातील तिन्ही कारखान्याच्या वतीने डिसेंबर अखेर पर्यंत 2500 रुपये प्रति टन एकर कमी दर देण्यात आला होता. 1 ते 15 जानेवारी पर्यंत एकर कमी 2550 रुपये व 15 ते 31 जानेवारी पर्यंत 2600 रुपये प्रति टन ( प्रति पंधरवडा 50 रुपये वाढ प्रमाणे एकर कमी दर देण्याचे ठरविले आहे.) त्यासोबतच फेब्रुवारी अखेर पर्यंत गाळपास आलेल्या उसास 2700 प्रति टन तर मार्च अखेर पर्यंत ऊस गाळपासाठी आल्यास एकर कमी 2800 रुपये प्रति टन भाव देण्याचे उद्योग समूहाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी ऊस तोडणी साठी घाई न करता आपला ऊस राखून ठेवून आपली आर्थिक उन्नती साधावी. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस पिकाला दर्जेदार भाव उद्योग समूहाच्या वतीने मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करावी जेणेकरून ज्या शेतकऱ्याला नवीन ऊस लागवड करण्याचे झाले असल्यास कारखान्याच्या ऊस विकास योजनेअंतर्गत ऊस रोप व बी बेणे घेऊन लागवड करावी असे आव्हान श्री मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांनी केले आहे.

Share This Article
error: Content is protected !!