स्पेशल/जलद गाडीच्या नावाखाली जादा रेलवे भाड्यातून होणारी प्रवासाची लुटथांबवा..डॉ.एस.एस.जाधव.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – मागील चार वर्षा पासून भारतीय रेलवे बोर्ड तथा रेलवे मंञालयाने आम जनतेसाठी चालणाऱ्या पॅसेंजर रेलवेच्या नावाखाली स्पेशल ट्रेन अथवा त्यास जलद रेल्वे बनवून दुपट भाडेवाड केल्यामुळे हज़ारो प्रवाशाची होत आसलेली आर्थीक लुट त्वरित थांबविन्याची मागणी (अपील)माहीतीचा अधिकार अभ्यासक तथा जेष्ट पञकार डॉ. एस. एस.जाधव यांनी अधिकृत ट्विट मध्यमाद्वारे व एका निवेदनाद्वारे दि.29.1.24रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व रेलवेमन्त्रि अस्विनी वैष्णन यांचेकडे केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,महामारी कोईड नंतर भारतीय रेलवे बोर्डाने दि.31.12.19 रोजी एक कमर्सिल नोटिफिकेशन जारी करून नवीन पॅसेजर गाडीसाठी 01पैसा दर तर जलद गाड्यासाडी 02 पैसा डब्बल दराने प्रवाशी भाडे अंमलात आणले आहे.परंतू मागच्या दाराने आम जनतेच्या पसेंजर रेल्वेगाड्या मोडीत काढल्या आहेत.त्या रेल्वे गाडयांना स्पेशल/जलद पसेंजरचे लेबल लावून दुपट रेल्वेचे भाडे दि.1.1.2020 पासून आकारले जात आसल्यामूळे 20-25 रू.चा फटका आम जनतेतील हजारो प्रवासाना बसत आहे. त्यामूळे द.म.रेल्वे/ नांदेड रेल्वे डिव्हिजन मधील पूढील पॅसेंजर गाड्याचे वाढविलेले भाडे/किराया (fare) त्वरित कमी करण्याची मागणी(अपील) डाॅ.जाधव यानी रेलवे मंञालयाकडे केलेली आहे.गाडी न.17661/62, 07970/71,11409,01413/14,07852,07776 व सवारी गाडी न. 07853,01414 याचा समावेश आहे.पॅसेंजर रेलवे गाड्याचे प्रवाशी भाडे दूप्पट का व कश्यासाठी केले ?आणी किती कालावधीसाठी आहे ?हा ही प्रश्न अपीलात डाॅ.जाधव यांनी उपस्थीत केलेला आहे.

Share This Article
error: Content is protected !!