खा. हेमंत पाटील यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे रुग्णास तब्बल दोन लाखाची आर्थिक मदत

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नांदेड प्रतिनिधी/ राहुल कोलते

नांदेड – जनसेवा हीच मानव सेवा या उक्ती प्रमाणे हिंगोलीचे भाग्यविधाते, कार्यतत्पर खा. हेमंत पाटील हे आपल्या कार्यशैलीतून ओळख निर्माण करतात. हिंगोली लोकसभा मतदारसंघात विकासाची गंगा वाहत आहे. त्याचप्रमाणे हळद संशोधन केंद्र असो सहकार क्षेत्रातील बँकिंग असो किंवा नुकतेच पार पडलेले नोकरी महोत्सवातून हजारो बेरोजगार युवकांना रोजगार देऊन स्वावलंबी बनविले. नांदेड येथील उत्तम माधव जाधव या रुग्णाचे मूत्रपिंड निकामी झाल्याने डॉक्टरांनी मूत्रपिंड प्रत्यारोपण (Kidney Transplant) करण्याचे सांगितले होते. त्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च येणार होता. रुग्णाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने सदर खर्च हे त्यांच्या आवाक्या बाहेरचे होते ही बाब शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख गजेंद्रगिर गिरी यांना समजतात त्यांनी तात्काळ खा.हेमंत पाटील यांची भेट घेऊन रुग्णाचा आजार व आर्थिक परिस्थितीची बिकट असल्याची माहिती सांगितली. रुग्णांच्या परिस्थितीची जाणीव होताच खा. हेमंत पाटील यांनी तात्काळ मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये प्रस्ताव दाखल करून राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या मार्गर्शनाखाली खा.हेमंत पाटील यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे अत्यल्प कालावधीमध्ये रुग्णांच्या मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून तब्बल दोन लाखाची आर्थिक मदत मिळवून दिली. आर्थिक निधी मंजूर झालेले पत्र पेशंट च्या वडीलास देताना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख गजेंद्र गिरी, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष शहर प्रमुख दुर्गेश बागडे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे अर्धापुर तालुका अध्यक्ष ऋषिकेश गुंडले 🙏🏻🙏🏻

Share This Article
error: Content is protected !!