विद्यार्थी चे प्रदेशाध्यक्ष प्रशांत दादा कदम व प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान युवा कार्येकर्ते शिवचंद्र पाटील डांगे यांच्या पक्षनिष्ठेचे व कार्याचे फळ म्हणून त्यांना मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे व विद्यार्थी चे प्रदेशाध्यक्ष प्रशांत दादा कदम ह्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी (अजित दादा गट) ३० जानेवारी रोजी निवड करण्यात आली.
आपल्या निवडीबद्दल प्रतिक्रिया नुतन राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवचंद्र पाटील डांगे यांनी पक्षाची ध्यैयधोरणे तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी कायम कटीबद्ध राहू तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठविण्यास तत्पर राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली..
त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व मित्रपरीवारसह राष्ट्रवादी् विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत …