राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहकार्यातून गावाचा विकास साधावा! – डॉ.तुळशीदास गुरनुले

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

माहूर तालुका प्रतिनिधी विजयसिंह हजारी
माहूर – राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून गावातील विविध प्रकारचा विकास साधण्याची संधी या शिबिराच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे!” असे मत माहूर येथील श्री रेणुकादेवी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.तुळशीदास गुरनुले यांनी व्यक्त केले.गुरुवार ०१ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील उमरा येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सात दिवसीय निवासी शिबीराच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षीय समारोपप्रसंगी ते बोलत होते.
कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ३१ जानेवारी ते ०६ फेब्रुवारी पर्यंत माहूर तालुक्यातील उमरा येथे हे शिबीर संपन्न होणार आहे.गुरुवारी ०१ फेब्रुवारी रोजी या शिबीराचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर उद्घाटक म्हणून सरपंच आकाश सुर्वे उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस पाटील विठ्ठलराव देशमुख,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दिलीप देशमुख, ग्रामपंचायत सदस्या अनुजा मोरे, कनिष्ठचे पर्यवेक्षक निलेश पाटील कनिष्ठचे रासेयो समन्वयक प्रा. निलेश पेंटावार इ.उपस्थित होते.
डॉ.इकबाल खान यांनी आपल्या मार्गदर्शनात महाविद्यालयाची शिस्त पाळण्याचे,तर प्रा.माधव जोशी यांनी या शिबीरातून स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करून घेण्याचे आवाहन स्वयंसेवकांना केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कृष्णा दुगाळे यांनी व प्रास्ताविक रासेयो समन्वयक डॉ.संदीप जाधव यांनी केले.तर उपस्थितांचे आभार सहसमन्वयक प्रा. अवधूत लांडे यांनी व्यक्त केले.
बळीराम पाटील मिशन मांडवीचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्ल राठोड व सचिव सौ. संध्याताई राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिरातील उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमास महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी सचिव पवन गवळी व विद्यार्थी एकनाथ मानकर यांच्यासह प्राध्यापक,गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि रासेयोचे स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!