वसमतकर महाराजांनी वाई बाजार येथे ग्रामस्वच्छता मोहिमेची रोवली मुहूर्तमेढ!

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

 

माहूर तालुका प्रतिनिधी/विजयसिंह हजारी

माहूर :- आनंद दत्त धाम आश्रम माहूरचे मठाधीश सद्गुरु साईनाथ महाराज वसमतकर यांनी श्री.संत बाळगीर महाराज स्वच्छता अभियानाद्वारे माहूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या वाई बाजार येथे बुधवार दि.३१ जाने.रोजी गो-माता मंदीपासून दत्त मंदीर परिसरात ग्राम स्वच्छता अभियान राबवून तालुक्यातील ग्रामीण भागात स्वच्छता मोहिमेची मुहूर्तमेढ रोवली.या अभियानांतर्गत वाई बाजार येथील महिला,पुरुष व भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हातात झाडु घेऊन गावातील रस्ते व सार्वजनिक परिसर झाडून गाव स्वच्छता करत नागरिकांना वैयक्तिक ते सार्वजनिक परिसर स्वच्छतेसह आरोग्यस्वच्छतेचा महान संदेश दिला.

 

श्री.संत बाळगीर महाराज आयोजित ग्रामस्वच्छता अभियानाची सुरुवात येथील गोमाता मंदीरापासून झाली असून,प्रथमतः साईनाथ महाराज यांनी सार्वत्रिक राष्ट्रगीत घेऊन गावातील नागरिकांना शिक्षण, व्यसनमुक्ती अशा विविध विषयांवर मोलाचे मार्गदर्शन करून ग्रामस्वच्छता अभियानाला सुरुवात केली.यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख अॅड.यश खराटे यांनी साईनाथ महाराजांचा पुष्पहार,शाल,श्रीफळ देवून सत्कार केला.

प्रथमतः गोमाता मंदीर परिसर स्वच्छ करुण गावातील मुख्य रस्त्यांवरील कचरा झाडून रस्ते स्वच्छ करत, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,हनुमान मंदिर परिसरातील संपूर्ण कचरा झाडून स्वच्छ करण्यात आला.तदनंर साईनाथ महाराजांनी येथील गुरुदेव मंदीरात जावून वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या आसनावर पुष्पमाला अर्पण करुन दर्शन घेतल्यानंतर ते दत्त मंदीर परिसराकडे मार्गस्थ झाले.दत्त मंदीर परिसर झाडून स्वच्छ केल्यानंतर या अभियानाची सांगता झाली.

यावेळी येथील ग्रामस्थाकडून व भाविक भक्ताकडून साईनाथ महाराज यांचेसह त्यांच्या समेवत आलेले जेष्ठ पत्रकार नंदु संतान,शिक्षक एस.एस पाटील,मिलींद कंदारे व सरपंच सिताराम मडावी,उपसरपंच उस्मान खान,मा.उपसरपंच अंबादास राजुरकर,पत्रकार कार्तिक बेहेरे,नितीन कन्नलवार,प्रशांत शिंदे,फिरोज खान यांच्यासह उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.गावात राबविण्यात आलेल्या या विशेष स्वच्छता मोहिमेमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चक्रधर सोनूले,शंकर सोनूले,संतोष सोनूले,वसंत शिंदे,वैभव खराटे,गजानन कलाने,गोरे,पंजाबराव माने,दराडे,

अविनाश हुलकने यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

श्री संत बाळगीर महाराज ग्राम स्वच्छता अभियान आनंद दत्त धाम आश्रम माहूरच्या माध्यमातुन साईनाथ महाराज वसमतकर यांनी राष्ट्रीय स्वच्छता अभियानातून स्वच्छतेचा वसा उचलेला असून,गावोगावी ग्रामस्वच्छता अभियान राबवून गांवातील नागरिकांना ग्राम स्वच्छतेकडे वळविले आहे. त्यामुळे साईनाथ महाराजांची ही आगळीवेगळी ओळख सर्वांप्रती मोठ्या आदराची ठरली आहे.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!