शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव देण्यात यावा यासाठी युवक काँग्रेस काढला बैलगाडीचा मोर्चा.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

भोकर ता प्रतिनिधी/गोविंद चिखलवाड.

भोकर – शेतकर्यांच्या मालाला अथवा पिकाला भाव वाढ करण्यात यावी या संदर्भात अशा बैलगाडी मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते.हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते,भव्य असा मोर्चा महात्मा बसवेश्वर चौक ते बोरगाव रोड येथुन निघला.आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक

येथे बाबासाहेब आंबेडकर यांना हार अर्पण करुन ,शिवाजी चौक छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालुन भव्य असा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला आणि जोरदार घोषणा बाजी करुन,मा तहसीलदार साहेब राजेश लांडगे यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री

यांना निवेदन देण्यात आले.उपस्थित युवक काँग्रेस चे तालुकाध्यक्ष आत्रिक पाटील मुंगल तथा बेंबरचे सरपंच

युवक काँग्रेस भोकर चे सर्वं पदाधिकारी आणि सभापती जगदीश पा.भोसीकर उपसभापती बालाजी पा.शानमवाड,संचालक रामचंद्र मुसळे, संचालक केशव पा. पोमनाळकर. आदीं कांग्रेस चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!