धनंज,सांगवी,हुस्सा परिसरात अवैध वृक्ष तोडणी जोमात प्रशासन मात्र कोमात.

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नायगाव ता प्रतिनिधी/ अशोक वाघमारे

नायगाव – तालुक्यातील मौजे धनंज,सांगवी,हुस्सा, परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष तोडणी होत असून याकडे मात्र प्रशासन मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. वृक्ष तोडणीमुळे मोठ्या प्रमाणात निसर्गाची हानी होत असून यामुळे पशु पक्षी यांना जगण्यासाठी भटकंती होताना दिसून येत आहे . या वृक्षतोडणीमुळे पक्ष्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होताना दिसून येत आहे. त्यांना छाया विना वणवण फिरावे लागत आहे.आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्राण्यांना आसरा मिळत नसल्याने शेतकरी व पशु पक्षी पालक यांना मोठा फटका झालेला दिसून येत आहे.
सदर वृक्षतोडणीमुळे निसर्गाची मोठी हानी होत असून यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळावे तसे पाऊस होणार नसल्याचे खंत देखील सांगण्यात येत आहे. आणि वृक्ष तोडणी मुळे शेतकरी मात्र मोठ्या चिंतेत दिसून येत असून .अवैध वृक्ष तोडणी करून ते लाकूड वीट भट्ट्या साठी मोठ्या प्रमाणात जात आहे. आणि काही मोठे झाडअसलेले त्यांचे लाकडं हे आरामशीन मशीन ला जात आहे.
सरकार एकीकडे झाडे लावा झाडे जगवा अशी संकल्पना राबवत आहे,आणि राज्यात व देशात वृक्ष वाघवड करण्यासाठी कोठ्यावाधीची निधी पुरवतात आणि संबंध जीव सृष्ठिला पोषक वातावरण निर्माण होण्याकरिता सरकानी योजना राबवित आहे तर मात्र दुसरीकडे अवैध्य पणे मोठ्या प्रमाणात वृक्ष तोडणी होत असून याकडे प्रशासन मोठ्या झोपेच्या सोंगात व जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. ही अवैध पणे वृक्ष तोडणी तात्काळ बंद करण्याची मागणी आता जोताना दिसून येत आहे

Share This Article
error: Content is protected !!