मूलभूत प्रशिक्षण सिपाही/ट्रेड्समन क्रम संख्या-01 च्या प्रशिक्षणार्थ्यांचा दीक्षांत समारंभ दिनांक 11 जुलै 2025

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

मुदखेड प्रतिनिधी राहुल कोलते

मुदखेड – येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण संस्थान, सेंट्रल ट्रेनिंग कॉलेजमध्ये एक भव्य दीक्षांत व शपथविधी समारंभाचे आयोजन करण्यात आले. या दीक्षांत समारंभात एकूण 148 कांस्टेबल / ट्रेड्समन यांनी त्यांच्या यशस्वी मूलभूत प्रशिक्षणानंतर देशाच्या विविध भागांमध्ये सेवा देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

या समारंभाचे मुख्य अतिथी श्री ख्वाजा सजनउद्दीन, पोलीस महानिरीक्षक, केंद्रीय राखीव पोलीस दल व प्राचार्य, सीटीसी मुदखेड यांनी या परेडची सलामी घेतली.

श्री सजनउद्दीन यांनी या नवप्रशिक्षित जवानांचे हे कठीण प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आपल्या भाषणात महानिरीक्षक / प्राचार्य यांनी ड्युटी दरम्यान कर्तव्ये बजावताना नव्याने पास झालेले सिपाही / ट्रेड्समन यांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर भर दिला. महानिरीक्षक / प्राचार्य यांनी विविध विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना ट्रॉफी प्रदान केल्या. परेडदरम्यान प्रशिक्षण कर्मचाऱ्यांनी विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून आपल्या कौशल्यांचे प्रदर्शन केले. प्रशिक्षणार्थ्यांच्या पालकांव्यतिरिक्त, नांदेड जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, इतर मान्यवर नागरिक आणि केंद्रीय विद्यालयाचे विद्यार्थी यांनीही या भव्य परेडचे साक्षीदार होण्याचा मान मिळवला.

या जवानांचे प्रशिक्षण दिनांक 17 मार्च 2025 रोजी सुरू झाले आणि 16 आठवड्यांच्या कठीण प्रशिक्षणानंतर आज दिनांक 11 जुलै 2025 रोजी संपन्न झाले. या कालावधीत, देशभरातील विविध राज्यांतून आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना कठीण शारीरिक व कौशल्यविषयक प्रशिक्षण देण्यात आले. आधुनिक प्रशिक्षण व उत्कृष्ट पायाभूत सुविधांसह सर्वोत्तम गुणवत्तेचे प्रशिक्षण मिळाल्यानंतर हे सर्व प्रशिक्षणार्थी राष्ट्रसेवेसाठी सज्ज झाले आहेत. पास आऊट झाल्यावर, सिपाही / ट्रेड्समन यांची नेमणूक देशाच्या विविध भागांमध्ये जसे की जम्मू-काश्मीर, डाव्या विचारसरणीच्या उग्रवादग्रस्त भागांमध्ये आणि ईशान्य भारतात केली जात आहे.

या प्रसंगी सीआरपीएफच्या लातूर येथील प्रशिक्षण संस्थेचे DIG श्री अमीरूल हसन अन्सारी, सीटीसी मुदखेडचे मुख्य प्रशिक्षण अधिकारी श्री वेद प्रकाश त्रिपाठी तसेच नांदेड जिल्ह्यातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, परिसरातील मान्यवर नागरिक, विविध शाळांचे शिक्षक व विद्यार्थी, पत्रकार यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला.

Share This Article
error: Content is protected !!