नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी नायगाव विधानसभा बूथ प्रशिक्षण शिबीर संपन्न.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्यातील नायगाव येथे राज्याचे माजी मंत्री तथा मा.खासदार भास्करराव पाटील खतगावकर साहेब व नायगाव विधानसभेचे लोकप्रिय मा.आ.वसंतराव पाटील चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत Connect बुथ कमिटी व्यवस्थापन प्रणाली(BLA)प्रशिक्षण मेळावा उत्साहात पार पडला.

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले.काँग्रेस IT Cell चे अभिजीत सपकाळ सर व अभिजित देशमुख सर यांनी बूथ व्यवस्थापन बदल उपस्थित सर्व BLA बंधूना माहिती दिली.

नायगाव विधानसभेचे लोकप्रिय युवा नेते रविंद्र वसंतराव पाटील चव्हाण साहेबांनी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.काँग्रेस प्रणित विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची निवड उपस्थितांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष अमरभाऊ राजूरकर,जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील शिंदे,नांदेड जिल्हा उपाध्यक्ष मिनलताई खतगावकर,यांच्या सह नायगाव विधानसभा मतदार संघातील तिन्ही तालुक्याचे तालुकाध्यक्ष व (सर्व BLA),बहुसंख्य आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!