श्री हजूर साहिब येथील स्थानिक धार्मिक गुरुद्वारा साहिब चे चौकी मेळाव्यासाठी भावीकमध्ये मोठा उत्साह – डॉ. विजय सतबीर सिंघ (R.IAS)

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड दरवर्षी प्रमाणे, स्थानिक गुरुद्वारा साहिबचे वार्षिक जोड मेला (चौकिया) 13 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होत आहे, त्यानुसार पहिली चौकी तख्त सचखंड श्री हजूर साहिब येथून निशान साहिब आणि निशानची सिंघ,घोडे, कीर्तनी जत्थे,गतका जत्थे, यांच्या नेतृत्वाखाली सचखंड श्री हजूर साहिब येथून सुरू होईल आणि गुरुद्वारा दमदमा साहिब येथे पोहोचेल.याबाबत माहिती देताना अधीक्षक ठाणसिंघ बुगई यानी सांगितले की,वार्षिक चौकी तख्त सचखंड साहिब येथून सकाळी आठ वाजता सुरू होणार असून जोडमेळ्याच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सकाळी 10.30 वाजता कथा कीर्तन ची सुरुवात होईल व श्री गुरु ग्रंथ साहिब चा हुकुमनामा पश्चात, लंगर दुपारी 1:00 वाजता सुरुवात होईल. सायकाळी चार वाजता चौकी साहिब तख्त सचखंड साहिबसाठी परत येईल,या चौक्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

 

13 फेब्रुवारी गुरुद्वारा श्री दमदमा साहिब बसमत नगर, 14 फेब्रुवारी गुरुद्वारा मालटेकडी साहिब18 फेब्रुवारी गुरुद्वारा संगत साहिब,24 फेब्रुवारी गुरुद्वारा हिरा घाट साहिब, 25 फेब्रुवारी गुरुद्वारा माता साहिब आणि गुरुद्वारा शिकारघाट साहिब 8 मार्च गुरुद्वारा रतनगड साहिब,9 मार्च गुरुद्वारा: नानकपुरी साहिब गुरुद्वारा: विष्णुपुरी साहिब आणि गुरुद्वारा: बांदा घाट साहिब हा रोजी शेवटची चौकी असेल.हे सलन चौकियां सिंघ साहिब जथेदार संत बाबा कुलवंत सिंघ जी आणि पंज प्यारे साहिबांच्या देखरेखीखाली सापण केले जातील.मुख्य आयोजक डॉ. विजय सतबीर सिघ जी यानी या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त भावीकाना सहभागी व्हावे, असे आवाहन केले.यातून जिथे धार्मिक मार्गदर्शन मिळते तिथे बंधुभाव आणखी वाढतो.असे उदगार अधीक्षकगुरुद्वारा सचखंड बोर्ड,नांदेड,यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

Share This Article
error: Content is protected !!