नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – संपूर्ण महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराज,फुले- शाहू -आंबेडकर -अण्णाभाऊ व तसेच अन्य महापुरुषांची प्रेरणा घेऊन
धाडस या सामाजिक वैचारिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद दादा कोळी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी,गोरगरीब,कष्टकरी, कामगार,व वंचित समाजाच्या घटकासाठी काम करणारी धाडस या सामाजिक संघटनेची बैठक आज दि.३.२.२४ रोजी दुपारी दोन वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथे पार पडली.
सदरील बैठकीच्या अध्यक्षस्थानी
मराठवाडा विभागीय अध्यक्ष गजानन पाटील कहाळेकर हे होते तर व्यासपीठावर महानगराध्यक्ष दत्ता पाटील खराटे, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर कदम, जिल्हाध्यक्ष प्रशांत गडमवार,
भगवान पाटील बोडके यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना गजानन पाटील कहाळेकर यांनी धाडस या सामाजिक संघटनेची ध्येय – धोरणे व पुढील दिशा संदर्भात उपस्थित नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना योग्य व सखोल असे मार्गदर्शन केले.व नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली.नांदेड युवक जिल्हाध्यक्ष उत्तरबालाजी लिंगोजी आरगुलवार,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष दक्षिण लक्ष्मीताई वाघमारे,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष उत्तरहरप्रीत कौर पुजारी,जिल्हा कार्याध्यक्ष उत्तर संदीप तावरे,महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष शीलादेवी ठाकूर, यांच्यासह तालुका व जिल्हा कार्यकारणीवर अनेक पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मराठवाडा विभागीय अध्यक्ष गजानन पाटील कहाळेकर व इतर मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचेसूत्रसंचालन प्रा. शशिकांत हाटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत गडमवार यांनी मानले.यावेळी अनेक महिला व पुरुषपदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.