नागरीकांच्या मुलभूत मागण्यासाठी भीमशक्तीचा मोर्चा.. महिलांचा लक्षणिय सहभाग

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने नागरीकांच्या विविध मुलभूत मागण्यासाठी दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक फुले नगर धर्माबाद येथून तहसिलवर भव्य मोर्चा काढण्यात आला. यामध्ये महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.

 

शासकीय जमीन,वन जमीन, गायरन जमीन,वक्क बोर्डाची जमीन व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जमिनीवरील अतिक्रमण धारकांचे कब्जे नियमानुकुल करावे व जमिनीचे ७/१२ त्यांच्या नावे विनाशुल्क करावे.पालीत,राहुटीत, झोपडीत आणि रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या बेघर नागरिकांना विनाशुल्क शासकीय गायरान जमिनीचे वाटप करुन मालकी द्यावी. 3)भाड्याच्या घरात राहणाऱ्या भुमिहीन बेघर भाडेकरु कुटुंबांना शासकीय जमिनीचे वाटप करावे व त्यांना मालकी द्यावी.

4) सर्व बेघर, अतिक्रमण धारक, भुमिहीन कुटुंबांना सरसकट घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी एकुण बजेटच्या किमान ४० टक्के बजेट राखीव करण्यात यावे.5) Zero Eviction Policy लागु करावे व आणि गृहनिर्माण हमी कायदा करावा.6) गॅस सिलेंडरचे मुल्य दर सरसकट रु. ४५०/- निर्धारित करावे.7) पेट्रोल,डिझेल वरील उत्पादन शुल्क आणि वॅट ९० टक्के कमी करावे.8) विज आकारणी ७० टक्के कमी करून प्रतियुनिट किमान दर निश्चित करावे आणि २०० युनिट विज मोफत द्यावे. या व इतर मागण्यासाठी भीमशक्तीचे तालुकाध्यक्ष शिवराज गायकवाड व शहराध्यक्ष अड. राहुल सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला व वरील मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार गावंडे यांना देण्यात आले.

 

यावेळी भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे, गंगाधर सोनकांबळे तालुकाध्यक्ष बिलोली, माधव पांगरीकर, सुधीर येलमे,किरण गजभारे, सायलू दासरवाड,श्रीमती शेख तसलीम,व्यंकटराव एडके,सुरेंद्र देवके,माधव कांबळे,देवराव निदानकर,दाऊ कांबळे, पत्रकार नारायण सोनटक्के यांच्यासह असंख्य महिला व नागरिक मोर्चामध्ये सहभागी होते.

Share This Article
error: Content is protected !!