गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर अबिचलनगर साहिबच्या कलम 11 मध्ये केलेली दुरुस्ती निरस्त करा

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – सिख गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर अबिचलनगर साहिव अॅक्ट 1956 च्या कलम11 मध्ये शासनातर्फे बदल करुन अध्यक्ष निवडीचा अधिकार शासनाने आपल्याकडे राखीव ठेवला आहे.

परंतु या कलम विरुध्द गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर अबिचलगर साहिब चे माननिय जत्थेदार साहिब आणि समुह पंजप्यारे साहिबान यांनी दि. 27/04/2014 मध्ये दुपारी 12:15 वाजता दर्शनी देवडी येथे माननिय पंजप्यारे साहिबान यांनी संयुक्त सभा घेऊन विरोध नोदविला होता.तसेच मा.पंच प्यारे साहेबांन ह्यांनी दि. 31-12-2023 रोजी सभा घेऊन प्रस्ताव पारीत केले की,आम्ही एक्ट मध्ये केलेल्या दुरुस्ती विरोधात घेतलेल्या निर्णयावर ठाम असल्याचे ठराव घेतले आहे.

 

असे असून सुध्दा दि.5-02-2024 रोजी महाराष्ट्र शासनाद्वारे एक्ट मध्ये बद्दल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याचा पंज प्यारे साहेबांन तख्त सचखंड श्री हजुर अबचलनगरनांदेड ह्यानी तीव्र निषेध केला आहे.

 

अशी माहिती जत्थेदार कुलवंत सिंघ प्र.मीत जत्थेदार राम सिंघगुरमीत सिंघ प्र.हैड ग्रंथी प्र. मीत ग्रंथी गुरदिप सिंघप्र.धुपीया सरबजीत सिंघगुरुद्वारा तख्त सचखंड बोर्ड, नांदेड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

Share This Article
error: Content is protected !!