कुंचेली येथे पन्नासवा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण व आम्ही वारकरी परीवार शाखा बोर्डाचे अनावरण

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नायगाव तालुका प्रतिनिधी/ अशोक वाघमारे. 

नायगाव – तालुक्यातील मौजे कुंचोली येथे श्री हनुमान मंदिर व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कुंचेली ता. नायगाव येथे ( दि. 8 फ्रेबु.२०२४ पासुन अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. सप्ताह काळात दररोज पहाटे ४ ते सहा वाजता काकडी आरती भजन, सकाळी 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी 11 ते 12 वाजता गाथा भजन, सायंकाळी पाच वाजता प्रवचन,सांय. 6 ते 7 हरिपाठ, रात्री आठ ते वाजता हरिकीर्तन आणि रात्री अकरा वाजता हरिजागर व भजन असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत.
सप्ताहात दि. 8 फ्रेबु. रोजी श्री ह.भ.प. विष्णुदास महाराज तांदळीकर, दि. 9 फ्रेबु. रोजी श्री ह.भ.प. त्रंबक महाराज नंदगावकर
दि. 10 फ्रेबु रोजी श्री ह.भ.प. योगेश महाराज वसमंतकर
, दि. 11 फ्रेबु
रोजी श्री ह.भ.प. राम महाराज पांगरगेकर. दि.12 फ्रेबु रोजी श्री ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज बरबडेकर दि.13 फ्रेबु. रोजी श्री ह.भ.प.विकास महाराज दसवाडीकर दि.14 फ्रेबु. रोजी श्री ह.भ.प. किसन महाराज बरबडेकर
दि.15 फ्रेबु. रोजी सकाळी ९ ते १२ दरम्यान श्री ह.भ.प. किसन महाराज बरबडेकर यांचे काल्याचे कीर्तन होईल.
गायनाचार्य हभप बापुराव पाटिल टाकळीकर, हभप गंगाजी महाराज खतगाव हभप भागवत पाटील तांदळीकर,साईनाथ पा.खैरगावकर,रमेश पा.खैरगाव,
मृदंगाचार्य हभप विश्वेश्वर महाराज कोंलबी,तुकाराम जाधव मोकासदरा,मइरदओडए सर येवती
दि.11 फ्रेबु. 2024 रोजी आम्ही वारकरी परीवार सेवाभावी संस्था शाखा बोर्डाचेअनावरण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह भ प राम महाराज पांगरेकर व इतर प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते अनावरण व नियुक्ती वितरण सोहळा सांय. 5 वाजता होईल दि.14 फ्रेबु.रोजी सांय 4 वाजता माऊलीची पालखी मिरवणूक निघणार आहे. सकाळी
9 ते 12 काल्याचे किर्तन होईल त्यानंतर महाप्रसाद होईल या सर्व कार्यक्रमांत परिसरातील भाविक, भक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेवून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त कुंचेली गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
असे प्रसिध्दीपत्रक श्री हनुमान मंदिर व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कुंचेली ता.
नायगावच्या वतीने करण्यात आले आहे.

Share This Article
error: Content is protected !!