उप अभियंतासह सहाय्यक अभियंत्याच्या ढिसाळ नियोजनामुळे बारूळच्या तळ्याचे पाणी रुई बु पर्यंत शेतकऱ्यांना मिळेना !!

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड –नायगाव पाटबंधारे विभागाच्या उप अभियंत्यासह संबंधित सहाय्यक अभियंत्याच्या ढिसाळ नियोजनामुळे बारूळच्या मनावर प्रकल्पाचे पाणी रुई पर्यंतच्या शेतकऱ्याला मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यातून संताप व्यक्त केला जात असल्याने सदरच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पाणी सोडण्यासाठी तात्काळ कॅनलची दुरुस्ती करून पाणी सोडण्यात यावे असे शेतकऱ्यातून बोलल्या जात आहे

या विभागाच्या मार्फत रुई बु येथे सदरच्या शासकीय इमारतीच्या भोवताली वृक्ष लावण्यासाठी खड्डे खोदले होते परंतु कुठे माशी शिंकली यांचा अंदाज लागला नसल्यामुळे सदरच्या खड्ड्यात अद्याप झाडे लावली नसल्यामुळे सदरच्या विभागाचा भोंगळा कारभार दिसून येत आहे.

नायगाव तालुक्यातील रुई बु येथे पाटबंधारे विभागा मार्फत बांधण्यात आलेल्या इमारतीच्या संदर्भात गेल्या अनेक वर्षापासून धुळखात असलेल्या व त्या भोवती झाडे झुडपे काटेरी झूडपे वाढले असल्यामुळे आता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला जाग आली कशी ? हा महत्त्वाचा प्रश्न भेडसावत असून या ठिकाणी कोणता ही कर्मचारी राहत नसल्याने सदरच्या इमारती बेवारस असल्याचे अनेक वर्षापासूनचे चित्र दिसत आहे

तालुक्यातील रुई बु.परिसरात गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या हिवाळी लागवडीसाठी पाणी सोडल्या जात होते परंतु उंटावर बसून शेळ्या हाकणाऱ्या अधिकाऱ्यांनी कॅनल दुरुस्त न केल्यामुळे व कॅनल मधील पाणी पार्सल होणाऱ्या विहिरी पडून त्यानं मध्ये पडल्यामुळे पाणी पुढे जात नाही असे असताना सुद्धा सदरच्या अधिकाऱ्यांनी लक्ष न देता जागेवर बसून काम पहात आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

संबंधित विभागाचे अधिकारी म्हणतात रुई बुच्या शेतकऱ्यानी पाणी सोडण्यासाठी मागणी केली नसल्याने पाणी सोडण्यात येत नाही खरे असले तरी या विभागाच्या बेजबाबदारपणामुळे अनेक ठिकाणी कॅनल फुटलेले असून काही ठिकाणी म्हणजेच अनेक ठिकाणी कॅनल नादुरुस्त बनल्यामुळे पाणी सोडण्यास सदरचे अधिकारी चाल ढकल करत असल्याचे स्पष्ट चित्र पाहवयस मिळत आहे.

Share This Article
error: Content is protected !!