नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – शिवाजीनगर चौकातील स्वांतत्र सेनानी कै आबासाहेब देशमुख लहानकर यांच्या ३४व्या पुण्यस्मरणा दिनाच्या कार्यक्रमा निमित्त प्रतिमेस माजी कुलगुरू डॉ एन व्ही कल्याणकर व डॉ.साहेबराव मोरे,एन.जी.देशमुख,संजय देशमुख लहानकर कृषीउत्पालन बाजार समिती सभापती,स्वतत्र सैनिक बाबूराव जोशी,सेवादलाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव धर्माधिकारी,सेवादल तालुका अध्यक्ष राजकमलसिंघ गाडिवाले,समाजिक न्याय विभागाचे जिल्हा महासचिव किशनराव रावणगाकर,यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे. सर्वानी पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे. या वेळी प्रस्ताविक प्राचार्य डॉ आबासाहेब कल्याणकर यांनी माढले पाटनूरचा जंगल कै. आबासाहेब लहानकराचा सत्याग्रहाचा सहभाग व इतिहास या बाबतीत विचार व्यक्त केले आहे.
यानंतर महानगरपालिकेचे माजी सभापती नंदकुमार कोसबतवार यांनी आपले मनोगंत व्यक्त केले आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी कुलगुरू डॉ.एन व्ही कल्याणकर यांनी आपले मनोगंत व्यक्त करते वेळी स्वतंत्र सेनानी आबासाहेब देशमुख लहानकरचे उमरखेड कॅम्प मधील कार्याचा इतर घटनांचा आढव घेतला तसेच आबासाहेब लहानकर यांचा इतिहास सर्वा पर्यंत पोहचवला पाहिजे
म्हणून त्याच्या इतिहासाचे लेखन होण्याचे आवाहन केले आहे.
तसेच स्वा.सेनानी आबासाहेब लहानकराच्या नावाने वाचनालय उभारावे जेने करून वाचनालयाच्या माध्यमातून इतरांना वाचायला मिळेल इतिहासाचे जतन होईल. तरुणपिढीना आबासाहेब देशमुख लहानकराचे कार्य इतरांना समजून येईल त्याचा आदर्श घेता येईल असे मनोगत व्यक्त केले आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित श्रीराम पिंपळगावकर,डॉ.शिवाजीराव भोसले,डॉ.विक्रम देशमुख, बाबतीत कपाटे येहळेगावकर, वसंतराव सर्जे,बाळासाहेब देशमुख शेंबोलीकर,राजकमलसिंघ गाडिवाले,किशनराव रावणगांवकर,अॅड गौतम सावते, इतरांसह उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार माजी नगरसेवक दुष्यंत सोनाळे मानले आहे या कार्यक्रमालचे आयोजन सुहास देशमुख लहानकर यश लहानकर नांदेड स्वतंत्र सैनिक यांनी आयोजन केले आहे.