शहर प्रतिनिधी/लक्ष्मण भैरेवाड
हिमायतनगर – तालुक्यातील वादळी वाऱ्यासह तुफान गारपिटीने आज 11 फेबुरवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास अचानक वादळीवाऱ्यासह गारांचा पाऊस झाला यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झाले.
हिमायतनगर शहरां सह तालुक्यातील सिरंजनी,बोरगडी,वाघी, जवळगाव, कामारी वारगटाकळी, सरसम, पळसपुर,घरापुर,खडकी, सरसम,पवना,टेंभुर्णी, सिरपल्ली, सह आदी गावात अचानक वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. सायकाळी 4 ते 5 च्या सुमारास सुपारी पेक्षाही मोठ्या गारा पडल्यामुळे अनेकांचे एकच धावपळ उडाली होती. तर शेती पिकात असलेल्या हरभरा, गहू, करडई, तूर, यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.