भोकर व उमरी तालुक्यात पावसाने थैमान घातले असून उभ्या पिकांचे अतोनात नुकसान.

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

जिल्हा प्रतिनिधी नांदेड/अशोक वाघमारे

नाोंदेड -भोकर व उमरी तालुक्यात पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे हवेत एक भोई सपाट झाल्याचे दिसून येत आहे. पावसाबरोबरच गारपीट देखील मोठ्या प्रमाणात झाल्याचे दृश्य दिसून येत आहे अक्षरशः गारपिटामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील ज्वारी हरभरा मक्का व पालेभाज्या आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले असून यामुळे शेतकरी मोठ्या संकटात असल्याचे दिसून येत आहे. गारपीट व पावसांच्या सरी कोसळल्याने शेतातील अतोनात पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी राजा मोठ्या अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. उमरी व भोकर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांच्या हाताशी तोंडाशी आलेले पीक निसर्गाने हिसकावून घेतल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील ज्वारी हरभरा हे पीक प्रामुख्याने या भागात मोठ्या प्रमाणात असून ज्वारी व हरभरा पिक हातातोंडाशी आले असता अचानक पावसाने हजेरी लावली आहे.

अवकाळी पावसाच्या मुळे उमरी लागत असलेल्या सोमठाणा व परिसरातील मोठ्या प्रमाणात पावसाने थैमान घातले असल्याने घरांची देखील पडझड झाल्याचे दिसून येत आहे. उमरी तालुक्यात बहुतांश प्रमाणात ज्वारी हरभरा गव्हांचे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे आणि आंब्याच्या झाडाला आलेले मोहरे गळून पडले त्याचबरोबर इतर फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात झडती झाल्याचे सांगण्यात येत आहे. सदर गारांच्या ढेगा प्रत्येक गावामध्ये जमा झाल्याचे दिसून येत आहे. म्हणून याकडे त्वरित प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज असल्याचे येथील शेतकरी यांनी सांगताना दिसून येत आहेत. आणि झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यात यावी अशी मागणी आता होताना दिसून येत आहे.

Share This Article
error: Content is protected !!