श्री संत शिरोमणी गोरोबा काका प्राणप्रतिष्ठान व कळशारोहन वसतिगृह लोकारपण सोहळा संपन्न

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड : स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संचालित श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या मंदिर प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण व वसतिगृह लोकार्पण सोहळा राज्याचे माजी मंत्री तथा मा.खासदार भास्करराव पाटील खतगावकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

सर्व समाजाला दिशा देण्याचे काम श्री संत शिरोमणी गोरोबा काका महाराज यांनी केले.समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक अभंग लिहली.अश्या विद्वान आणि वारकरी संप्रदायातील संत शिरोमणी गोरोबा काका महाराज यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व कलशारोहनात मला येता आले हे मी माझे भाग्य समजतो असे खतगावकर साहेब म्हणाले.

 

यावेळी ह.भ.प.राम महाराज पांगरेकर,श्री गुरु नागेंद्रगयबी महाराज भारती,किशोर स्वामी – माजी सभापती,संजय देशमुख लहानकर-सभापती,संतोष पांडागळे-प्रवक्ते काँग्रेस कमिटी नांदेड,दीपक पावडे-जिल्हा सरचिटणीस काँग्रेस कमिटी नांदेड,सतीश बस्वदे – ब्लॉक अध्यक्ष सिडको,शंकरराव नांदेडकर,विश्वनाथ कोलमकर,मोहनराव जगदाळे,अनंत कुंभार,डॉ.प्रशांत देवडे,बालाजीराव गव्हाणे,रंगनाथ सूर्यवंशी,देविदास बसटवार,भीमराव दळे,श्रीनिवास भोसले,पुंडलीकराव घुमलवाड,गंगाधर ढवळे,व्यंकटेश गोथरम,केरोजी अचारे,श्रीराम तेलंग,राजकुमार गुरवे,मोहन जगदाळे,माधव दूधभाते,महेश कांनगुले,राजकुमार बोरगुळे,सौ.कविता राजे,अनिता मैलारे,बालाजीराव तेलंग,गजानन कालमवार,लक्ष्मण विभुते,संदीप आलुरे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पांगरेकर यांनी केले.तर कार्यक्रमाचे सुंदर पद्धतीने आयोजन विजय देवडे लहानकर यांनी केले.सदर कार्यक्रमास जिल्ह्यातील व राज्यातील कुंभार समाज बांधव उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!