उत्तर प्रदेश –उत्तर प्रदेशमधून धक्कादायक घटना समोर आली आहे,लग्नाच्या सातव्याच दिवशीच नव्या नवरीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पतीने स्टॅमिना बुस्टर गोळ्या खाऊन शारीरिक संबंध ठेवल्याने पत्नीचा तडफडून मृत्यू झाल्याचा आरोप मृतक महिलेच्या वहिणीने केला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, हमीरपूर शहरातील काम करणाऱ्या एका सरकारी विभागाच्या कर्मचाऱ्याने त्याच्या बहिणीचं लग्न जवळील एका गावातील तरुणासोबत लावून दिलं होतं. या सरकारी कर्मचाऱ्याला आई-वडील नसल्याने त्याने स्वत:च्या बहिणीचं लग्न धुमधडाक्यात केलं.
विवाहित तरुणीच्या वहिणीला सात फेब्रुवारीला फोन आला. वहिणीला तिच्या नणंदच्या सासरच्या मंडळीकडून कॉल आला होता. सासरच्या मंडळीने आरोप केला की, तुम्ही तरुणीचा आजार लपवून लग्न केलं आहे. तिला उलट्या होत आहे. तिची तब्येत ठिक नाही’.
नणंद आजारी असल्याचे कळताच तिच्या माहेरची मंडळी तातडीने तिच्या सासरी आले. त्यानंतर तिला तातडीने कानपूरमधील रुग्णालयात दाखल केलं. तिथे नव्या विवाहितेवर उपचार करण्यात आले. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. नणंद आजारी का पडते, याचं कारण विचारल्यावर तिने सांगितलं की, तिने पती स्टॅमिना बुस्टर गोळ्या खाऊन शारीरिक संबंध ठेवत असल्यामुळे सारखी आजारी पडत असल्याचे सांगितले.
पुढे मृत विवाहितेच्या वहिनीने सांगितलं की, नणंदला कानपूरमधून दुसरीकडे एका स्त्री रोग डॉक्टरकडे घेऊन गेलो. मात्र, त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला. ‘पतीने विवाहितेसोबत चुकीच्या पद्धतीने संबंध ठेवल्याने इन्फेक्शन झालं . ते संपूर्ण शरीरात पसरलं. त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांनी तिच्या वहिनीला सांगितले.
मृत विवाहितेच्या भावाने सांगतिलं की, बहिणीच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहाला पोस्टमार्टम करण्यासाठी पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणी बहिणीच्या सासरच्या मंडळीच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितलं.