अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाचा माहूर मध्ये जल्लोष!

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

माहूर तालुका प्रतिनिधी/विजयसिंह हजारी

माहूर : महाराष्ट्रातलं एक ज्येष्ठ आणि दिग्गज नेतृत्व,नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र,लोकसभा आणि विधानसभा गेली अनेक वर्षे ज्यांनी गाजवली.विविध मंत्रीपदं ज्यांनी भुषवली.दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र अशोकराव चव्हाण यांना शंकरराव चव्हाण यांच्या कडुनच राजकारणाचं बाळकडू मिळालं.त्यांचे सुपुत्र म्हणून शंकरराव चव्हाण यांचा राजकीय वारसा सांभाळण्याचा अशोक चव्हाण यांनी त्यांच्या परीने पूर्ण प्रयत्न केला.वडील आणि मुलगा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याचं शंकरराव चव्हाण आणि अशोकराव चव्हाण यांच एकमेव उदाहरण असून,खरंतर ‘अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर’ अशा मथळ्याच्या बातम्या टीव्ही चॅनेलसह वर्तमानपत्रात मागील काही कालावधीपासून दर काही महिन्यांनी झळकत होत्या.
चव्हाण मात्र हे फेटाळून लावत होते.मात्र त्या बातम्यांमध्ये कुठेतरी तथ्यांश होता,हे आता दि.१२ फेब्रूवारी रोजी अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा (विधानसभा सदस्यत्व) राजीनामा देत दि.१३ फेब्रुवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार,नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन,नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आदींच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केल्यानंतर सिद्ध झाले आहे.ही माहिती कळताच माहूर शहरासह तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी दि.१३ रोजी बसस्थानकासमोरील चौकात फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी भाजपा ता.अ.कांतराव घोडेकर,भाजयुमो.जि.अ.संदीप राठोड,प्र.चिटणीस अनिल वाघमारे,जिल्हा उपाध्यक्ष अविनाश राठोड,ता.सरचिटणीस अपील बेलखोडे,अमोल पाटील, महिला प्र.का.सदस्या पद्मा गिऱ्हे,श.अ.पुरुषोत्तम लांडगे, नगरसेवक सागर महामुने, भाजयुमो.ता.अ.विनायक मुसळे,जि.का.सदस्य विजय आमले,नंदकुमार जोशी, भाजयुमो श.अ.शुभम ठाकूर, जीवन अग्रवाल,निळकंठ मस्के, संतोष तामखाने,अर्जुन मोहिते, अर्चना दराडे,निर्मला जोशी, संजय शेडमाके,किशोर राठोड, नंदकुमार कोलपवार,नागरगोजे दत्ता शेरेकर यांच्या सह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!