नांदेड जिल्हा प्रतिनिधी/अशोक वाघमारे.
नांदेड जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री अशोक चव्हाण यांना ईडीच्या धाकाने किंवा जिल्ह्यातील मतदारांच्या अविश्वासाने की सत्तेचा लोलसा पोटी हा निर्णय घ्यावा लागला अशा चर्चा ना आता जिल्ह्यातील सामान्य मतदार यांच्याकडून प्रतिक्रिया येताना दिसून येत आहे. श्री अशोक चव्हाण हे नांदेड जिल्ह्याचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते व राजकीय, सामाजिक अनुभवी नेते म्हणून नेते म्हणून ओळख असलेले व राजकारणाचे सूक्ष्म व्यवस्थापन व गोरगरीब व शेतकरी सामान्य जनतेच्या हितांचे विचार करणारे असे म्हणून संबंध राज्यामध्ये ओळख आहे. श्री अशोक चव्हाण यांनी अचानकपणे भाजप प्रवेशांची कल्पना सामान्य जनतेला नसल्याकारणाने जिल्ह्यातील व मराठवाड्यातील सामान्य जनता संभ्रम अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसला मोठा धक्का बसला असून मात्र जिल्ह्यातील भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांना तेवढाच धक्का बसल्याचे देखील सांगण्यात येत आहे. कारण की भाजप हा पक्ष नांदेड जिल्ह्यामध्ये वाढविण्यासाठी पूर्वीपासून घेतलेली मेहनत आणि पक्ष वाढीसाठी अति परिश्रम घेऊन पक्षाला जिल्ह्यामध्ये मोठे बळ देण्याचे काम ज्या निष्ठावंत कार्यकर्ते व नेत्यांनी दिले असून त्या नेत्यांचं काय असे प्रश्न आता होताना दिसून येत आहे. एकीकडे काँग्रेसमुक्त नांदेड जिल्हा अशी वल्गना सुरू असताना दुसरीकडे मात्र काँग्रेसला नवे चेहरे देऊन काँग्रेसला पुन्हा उभारी देण्याचे काम वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी सांगितले आहे. राज्यातील व देशातील काँग्रेस बड्या नेत्यांनी सांगताना नांदेड जिल्ह्यातील एक नेता गेल्याने पक्ष संपला असा होत नसून पक्षाला नव्याने, उभारी पक्ष संघटना मजबूत करण्याचे आश्वासित देखील. काँग्रेस मतदार वर्ग नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असून ते कदापेही भाजपला मदत करू शकत नाही असे देखील राज्यातील काँग्रेस नेत्यांनी सांगितले आहे. आणि जे पक्षाशी बेईमानी करून पक्षाने एवढा मोठा पदावर नेऊन देखील अशा पद्धतीचा निर्णय हा चुकीचा असून त्यांना जिल्ह्यातील मतदार वर्ग निश्चित पणाने जागा दाखवेल असं देखील सांगण्यात आल्याचे माहिती मिळाली आहे. जिल्ह्यातील एक नेता गेला म्हणजे पक्ष संपला असं होत नसून पक्षाला अनेक जिल्ह्यातून नवीन चेहरे असल्याचे देखील काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने नांदेड जिल्ह्यातील सामान्य मतदार वर्गामध्ये मात्र मोठा असंतोष निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. अशोक चव्हाण यांच्यावर विश्वास असलेली जनता आता अशा निर्णयाने संभ्रम अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. श्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जरी गेले असले तरी जिल्ह्यातील काँग्रेस मतदार वर्ग मात्र भाजपला किंवा भाजप उमेदवाराला निश्चितपणाने धडा शिकविल अशा पद्धतीचे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून करून दाखवू अशा चर्चा होताना दिसून येत आहे. देशात भाजप व मोदी सरकारने शासकीय यंत्रणाच्या जोरावर देशात सुडाचे राजकारण चालू केले असून देशातील मोदींचे सरकार मजबूत नसल्याकारणाने देशातील राजकीय पक्ष फोडून भाजप पक्ष मजबूत करण्याच्या नादात असल्याचे सांगण्यात येत आहे. देशातील व राज्यातील नेत्यांना ईडी चा धाक दाखवून नेत्यांना पक्षांमध्ये प्रवेश देण्याचा धंदा चालवल्याचे सांगण्यात येत असून हे धंदा मोडीत काढून पुन्हा लोकशाही विरोधी पक्षांना धडा शिकवू व भाजप नेते कटकारस्थान करून राज्यातील महत्त्वांच्या तीन पक्षाची विभागणी करून पक्ष मजबूत करत असल्याचे सांगण्यात येत जरी असले तरी फडवणीस व बावनकुळे यांना कळून चुकले आहे की जनता अद्यापही आपल्या बाजूने राहायला तयार नसून त्याला एकमेव पर्याय म्हणजे पक्ष फोडून भाजप पक्षाचा मोठ्या प्रमाणात विस्तार करून व त्या आधारावर निवडणुका घेण्याचे सॉंग करून जनतेची मोठ्या प्रमाणात दिशा भूल करत असल्याचे व राज्यामध्ये जातीय द्वेष निर्माण करून जातीपातीचे राजकारण करून देशामध्ये व राज्यामध्ये पुन्हा भाजपचे सरकार आणण्याचे स्वप्न पाहणाऱ्या फडणवीस यांना निश्चितपणाने आगामी निवडणुकीमध्ये जनतेच्या मोठ्या रोशाला सामोरे जावे लागणार आहे. देशातील काँग्रेसमुक्त भारत करण्याचे संकल्प ज्या मोदी साहेबांनी घेतले त्या मोदींना मात्र तसे काही होताना दिसून आले नाही मात्र संपूर्ण देशातील भाजप हा काँग्रेसमय करून घेतल्याचे मात्र दिसून येत आहे. अशाच भाजप राज्यामध्ये करत असलेल्या सुरांचे राजकारण यांना निश्चितपणाने आगामी निवडणुकीमध्ये सामान्य जनता व मतदार यांनी जागा दाखवून देईल अशा पद्धतीची उलट सुलट चर्चा आता होताना दिसून येत आहे.
भाजप पक्षाकडून व भाजप केंद्र सरकारकडून श्री अशोक चव्हाण यांना ईडीचा धाक दिले असावेत किंवा अशोकराव यांनी जिल्ह्यातील मतदार यांच्यावर अविश्वास दाखवून किंवा सत्तेच्या लालसापोटी चव्हाण यांनी हा निर्णय घेतला असावा अशा चर्चा मात्र मोठ्या प्रमाणात नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये होताना दिसून येत आहे.