धर्माबाद येथील महालक्ष्मी वे ब्रिजचे मापात पाप वजन माप फसवणुकीवर बसेल का चाप!

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

वैधमापन अधिकाऱ्याच्या आणि मालकाच्या संगनमताने चालतो मापात माप

नांदेड जिल्हा प्रतिनिधीसंजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्यातील धर्माबाद शहरात सुप्रसिद्ध असणारे महालक्ष्मी ऍग्रो वे ब्रिज आज वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे.आज मुधोल येथील एक शेतकरी आपला माल धर्माबाद येथे विकण्यासाठी आला असता राठी वे ब्रिज येथे 3980 किलो तर महा लक्ष्मी वे ब्रिज येथे 3960 किलो वजन आले 20 किलो वजन कमी आले आहे.

त्यामुळे एकच हडकंप उडाला. शेतकरी आपल्या घामाच्या पैश्याने पीक पिकवत असतो त्याच्या घामाचे मोल मिळू नये म्हणून व्यापारी अधिकारी आणि काटा मालकाचे उघड संबंध असल्याचा प्रकार आज महा लक्ष्मी वे ब्रिज येथे उघडकीस आले आहे.

काटा मालक अगोदर क्या करने का है ओ करलो म्हणत शेतकरी बांधवाला तंबी देत होता.घटनास्थळी पत्रकार बांधव येताच आपली चूक लक्षात आल्या नंतर उपरोक्त शेतकऱ्याची माफी मागितली आहे.असे किती दिवसा पासून महा लक्ष्मी वे ब्रिज वर गोरखधंदा चालू आहे हा तपासणीचा भाग आहे.

मापात वैधमापन विभागाच्या वतीने व्यापाऱ्यांकडे असलेली वजने,मापे व काटे दरवर्षी तपासण्यात येतात.ही तपासणी करण्यासाठी विभागाने काटे दुरुस्ती करणाऱ्या अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे.तरी सुद्धा शेतकरी बांधवांची फसवून होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

Share This Article
error: Content is protected !!