हुस्सा येथील भाविकानी अखं एक किलोमीटर चा पायी प्रवास करून पाऊस न पडल्याने गोदावरी पात्राच्या जलाने घातले गावातील देवाला स्नान…

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नायगाव ता प्रतिनिधी/ अशोक वाघमारे.

नायगाव : तालुक्यातील हुस्सा येथील गावातील भाविकांनी अखं एक कि मी चा पायी प्रवास करून गोपाला गोपाळा देवकी नंदन गोपाळा व जय हनुमान महाराजांच्या जय जय कारांच्या जयघोष करीत प्रवास करून आणि डोक्यावर पाण्याचे भांडी घेत गावातील संपूर्ण देवाला पाणी घालून देवाकडे साकडे घातले आहेत. हुस्सा व हुस्सा परिसरात पाऊस न झाल्याने बळीराज्या चिंतेत दिसून येत आहे या भागात मागील काही दिवसापूर्वी तुर्लक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. पण पेरणी होताचं मेघ राज्याने दांडी मारले असता शेतकरी हवालदिन झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतकरी पहिलेच कर्ज बाजरी होऊन कसाबसा शेतात पेरणी केले पण त्याचे पाण्याविना बळीराज्या अडचणीत असल्याच सांगण्यात येत आहे.
म्हणून सदर गावकऱ्यांनी गावातील देवाना गोदावरीचे पवित्र जालश्याने जलाभीषक तब्ब्ल पाच दिवस करण्याचा निर्धार केला आहे त्यामळे या जलभीषकाला आज पासून सुरुवात झाली आहे. आणि सायंकाळी गावातील बालगोपालांना भंडारा सुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती उपस्थित शेतकऱ्यानी दिली आहे.
सदर गावातील शेतकऱ्यांनी देवाकडे मोठ्या आशेने पाहून पाणी पडण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. हुस्सा येथील शेतकऱ्यनी आता देवालाच साकडे घातले आहे कि देवा वेळेवर पाऊस होऊ दे आणि शेतकऱ्याला चांगले दिवस येऊ दे आणि शेतकरी सुखी तर जग सुखी आहे म्हणत हुस्सा येथील अनेक शेतकऱ्यांनी भावना व्यक्त केली आहेत.म्हणून शेतकऱ्यामध्ये असंतोषचे वातावरण दिसून येत आहे.

Share This Article
error: Content is protected !!