मौजे हुस्सा येथे 11व्या श्री हनुमान मंदिर कलशारोहण वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा.

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/अशोक वाघमारे

नायगाव – तालुक्यातील मौजे हुस्सा येथे दरवर्षीप्रमाणे श्री हनुमान मंदिर 11व्या कलशारोहण वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सप्त्याचे आरंभ दिनांक 19 -2- 2024 रोज सोमवारपासून ते सांगता दिनांक 26 -2- 2024 पर्यंत हुस्सा नगरीमध्ये हरिनामाचा गजर मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रसंगी जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील नामवांत व दिग्गज ज्ञानवंत कीर्तनकारांचा हरिनामांचा गजर कार्यक्रम होणार आहे सदर कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात दिग्गज संतांची व भक्ताची अलोट गर्दी जमणार असल्याचे संयोजक मंडळीकडून सांगण्यात आले. याप्रसंगी नाचू कीर्तनचे रंगी / ज्ञानदीप लावू जगी या युक्तीप्रमाणे निश्चितच भक्त मंडळी सदर कार्यक्रमाचा आनंद घेण्याकरिता उपस्थित राहावे व कीर्तन श्रवणचा लाभ घेऊन जीवन कृतार्थ करून घ्यावे. या सप्ताह दिनचर्यामध्ये दि. 19/2/2024 रोज आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड चे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. श्री राम महाराज पांगरेकर यांचे सुश्रावे कीर्तन सेवा होणार आहे. तर दि. 20/2/2024 रोजी ह.भ.प. श्री. प्रकाश महाराज साखरे परभणीकर, तर दि.21/2/2024 रोजी ह.भ.प.श्री. डॉ दिगंबर महाराज गडगेकर, तर दि. 22/2/2024 रोजी ह.भ.प. श्री किशोर महाराज काळे आळंदीकर, तर दि. 23/2/2024 रोजी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड चे उपाध्यक्ष ह.भ.प. श्री गंगाधर महाराज हंबर्डे दरेगावकर, व दि. 24/2/2024 रोजी ह.भ.प.श्री गंगाधर महाराज खैरे परभणीकर,व दि. 25/2/2024 रोजी ह.भ.प. श्रीधर महाराज कासरालीकर आणि दि 26/2/2024 रोजी सकाळी 9ते 11 पर्यंत काल्याचे कीर्तन ह.भ.प. श्री अविनाश महाराज बिजलगांवकर यांच्या रसाळ अमृत वाणीतून कीर्तन सेवा व त्यानंतर म्हाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या पवित्र कार्यक्रमात दिग्गज गायक, वादक, कलाकार, उपस्थित राहणार आहेत. तर या पवित्र कार्यक्रमाचे हुस्सा व हुस्सा परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घेऊन जीवन कृतार्थ करून घ्यावे असे आवाहन हुस्सा गावकरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share This Article
error: Content is protected !!