प्रधानमंत्री मुद्रालोन योजना कार्यशाळेला वसंतराव नाईक महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड : येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने भारत सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रालोन योजनेवर एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. हा कार्यक्रम आईसीएसएसआर प्रायोजित होता. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार हे होते.

कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.

प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त अधिकारी तथा याप्रसंगी नॅशनल रिसोर्स परसन दीक्षित काका,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र संकुलाच्या माजी संचालक डॉ. वाणी लातुरकर मॅडम,उद्योजक रोहित वडगावकर, आयडीबीआय बँकेचे क्रेडिट ऑफिसर निखिल बोरकर, शासकीय गिरीराज कॉलेज निजामाबादचे प्रा. सत्यवर प्रसाद, डॉ. गजानन मुधोळकर यांची उपस्थिती होती.याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. व्ही.आर.राठोड आणि वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.प्रदीप बिरादार यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यामाने घेण्यात आलेल्या एक दिवसीय कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ.वाणी लातूरकर यांनी केले. या प्रसंगी दीक्षित काका यांनी भारत सरकारच्या प्रधानमंत्री जनधन योजना,प्रधानमंत्री सुरक्षा जीवन विमा योजना आणि मुद्रा योजना या विषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.उद्योजक रोहित वडगावकर यांनी उद्योग नोंदणी, विविध बँकांचा वित्त पुरवठा, जिल्हा उद्योग केंद्राच्या मदतीने कसा केला जातो याविषयी माहिती दिली.निखिल बोरकर यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे या विषयाच्या अनुशंगाने मार्गदर्शन केले.डॉ गजानन मुधोळकर यांनी मुद्रा लोन संदर्भात नव उद्योजक व उद्योजकाना नाविन्यपूर्ण विविध उद्योजक आयाम आणि मुद्रा लोन च्या पात्रता निकष लाभार्थी आणि प्रक्रिया या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे समाधान करण्यासाठी प्रश्नोत्तराचे सत्र घेण्यात आले.

 

या सत्रातून विद्यार्थ्यांच्या मनातील अनेक प्रश्नांचे समाधान मान्यवरांनी केले.अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांनी समकालीन परिस्थितीत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या नवीन आर्थिक योजनेचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी उद्योगाकडे वळावे, असे आवाहन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.साहेबराव शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.वाणी लातूरकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.

Share This Article
error: Content is protected !!