नायगाव तालुका प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नायगाव – जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज नाणीजधाम संस्थान यांच्या सामाजिक उपक्रमातुन नायगाव येथील शासकीय रुग्णालयात आज दि.२४ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन या शिबीरात जास्तीत जास्त भाविकांनी रक्तदान करुन सामाजिक कार्याला मदत करावी अशी विनंती नायगाव तालुका स्व – स्वरूप संप्रदाय सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
अनंत श्री.विभुषित जगतगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज संस्थानच्या वतीने अध्यात्मिक कार्यक्रमा बरोबरच देहदान,वृक्षारोपण, स्वच्छता अभियान,व्यसनमुक्ती, २४ तास मोफत अंबुलन्स सेवा असे अनेक समाज उपयोगी उपक्रम दर महिन्याला राबविण्यात येत असतात त्याअनुषंगाने सर्वश्रेष्ठ असलेले रक्तदान शिबीराचे आयोजन आज नायगाव येथील शासकीय रुग्णालयात सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून या शिबीरात जास्तीत जास्त भाविकांनी रक्तदान करुन सामाजिक कार्याला मदत करावी अशी विनंती नायगाव तालुका स्व – स्वरूप संप्रदाय सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.