मौजे बारड येथे शीतलाई पापड उद्योग भव्य शुभारंभ सोहळा संपन्न

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

मुदखेड प्रतिनिधी / राहुल कोलते

 

मुदखेड तालुक्यातील मौजे बारड येथे शितलाई पापड उद्योग भव्य शुभारंभ सोहळा माजी आमदार सौ.अमिताताई शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला.

उमेद – महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान,अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण भागातील बचत गटातील महिलांनी पुढे येऊन व्यवसाय करायला हवा असे अवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री.रमेश थोरात यांनी महिलांना मार्गदर्शन करताना केले. आतापर्यंत महिलांनी चूल आणि मूल हे सांभाळलेले आहे. खरंच देशाची प्रगती करायची असेल तर महिला उद्योजक झाल्याशिवाय पर्याय नाही असेही ते पुढे बोलताना सांगितले. नांदेड जिल्हा महिला बचत गट उद्योगात अग्रेसर झालं असून ग्रामीण भागात हे बचत गटाचे माध्यमातून पापड उद्योगासह अनेक उद्योग उत्पन्न होत आहेत. महिलांनी आपल्या कुटुंबाची प्रगती साधण्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी उद्योगाकडे लक्ष द्यायला हवे.असे मार्गदर्शन करताना सांगितले महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहायचे असेल तर बचत गटाचे माध्यमातून अनेक बँक साह्य करण्यास सक्षम आहेत. कर्ज घेत असताना महिलांनी आपल्या उद्योगाकडे लक्ष देऊन आपला उद्योग वाढवला पाहिजे. तसेच बँक कर्जाची परतफेड करत आपला व्यवसाय वाढवायला हवा. असा सल्ला उद्घाटन प्रसंगी बोलताना माजी आमदार अमिताताई चव्हाण यांनी दिला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कुमारी श्री.श्रीजया अशोकराव चव्हाण.माजी महापौर सौ मंगलाताई निमकर, माजी महापौर शैलजा स्वामी, माजी जि.प.सदस्य सौ. प्रतिभा बाळासाहेब देशमुख, प्रा. कैलास दाड, सरपंच प्रभाकर आठवले, उपसरपंच बाळासाहेब बारडकर, टी.बी.दीक्षित,स.पो.नि.केदासे, रमेश थोरात, भारतीय स्टेट बँकेचे चाळणेवाड, महावितरणाचे शाखा व्यवस्थापक देशमुख, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा अधिकारी देशमुख, देशोन्नतीचे पत्रकार संजय कोलते, अब्दुल रजाक, राहुल कोलते, ग्रा.पं. सदस्य सौ.इंदुबाई भिसेवार,सौ. सपना पुलकुंटवार, तालुका अभियान व्यवस्थापक गणेश आरोटले, बरड प्रभाग समन्वयक राधिका मिरदुडे, मुकट प्रभाग समन्वयक वैशाली कोतवाले, व बारड येथील महिला सक्षमीकरणाचा जो वसा घेतलेला आहे अशा सौ.रमाबाई गंगाधर वावळे बँक सखी, सौ. प्रेमीला नामदेव आमदुरकर icrp, मेघा अनिल सुकापुरे कृषी सखी, शारदा गजानन जाधव कृषी सखी, अश्विनी नारायण नकाटे icrp, सौ.गोदावरी बालाजी आंब्रे, सौ.शितल संदीप लोमटे, सौ. मंगल कोंडीबा सुखापुरे,सौ. शितल पुंजाजी सुखापुरे,सौ अंजली पांडुरंग कदम, सपना सोळंके कृषी सखी आणि तालुक्यातील प्रत्येक गावातील ICRP ताई व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदुरकर यांनी केले व सूत्रसंचालन प्रल्हाद जोंधळे यांनी केले आणि आभार तालुका अभियान व्यवस्थापक गणेश आरोटले यांनी मांडले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

Share This Article
error: Content is protected !!