इंदिरा गांधी महाविद्यालयास नॅक ‘बी.प्लस’ दर्जा प्राप्त.

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित सिडको येथील इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालयास नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद बेंगळुरू द्वारे नॅक सायकल सेंकड तपासणीत बेंच मार्क कठीण असतानासुद्धा सर्वांनी घेतलेल्या मेहनतीला यश मिळाले असून महाविद्यालयास ‘बी प्लस’ दर्जा प्राप्त झाला आहे.

विशेष बाब म्हणजे यापूर्वी झालेल्या पहिल्या नॅक तपासणीत ‘ब’ दर्जा प्राप्त झाला होता.
या तपासणीसाठी तपासणी अध्यक्ष म्हणून बिहार राज्यातील डॉ.अनिलकुमार ओझा,तर समन्वयक सदस्य म्हणून आसाम येथील डॉ.धर्मेंद्र नाथ आणि सदस्य म्हणून छत्तीसगड येथील डॉ.प्रकाशचंद्र चोबे उपस्थित होते.
महाविद्यालयातील प्राचार्य. डॉ. राजेंद्र माळी यांच्या मार्गदर्शनाखाली मागील काही वर्षांपासून या तपासणीला सामोरे जाण्यासाठी अनेक समित्या गठीत करण्यात आलेल्या होत्या.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान राज्यसभा खासदार मा.अशोकराव चव्हाण, संस्थेचे उपाध्यक्ष मा.अमिता चव्हाण, संस्थेचे सचिव व महाराष्ट्र राज्याचे माजी उच्च शिक्षण राज्यमंत्री मा.डी.पी.सावंत, संस्थेचे सहसचिव प्राचार्य. डॉ. रावसाहेब शेंदारकर, संस्थेचे कोषाध्यक्ष, ॲड.उदयरावजी निंबाळकर व संस्थेचे सर्व कार्यकारिणी सदस्य यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. राजेंद्र माळी, नॅक समन्वयक डॉ.राजकुमार पवळे, अंतर्गत गुणवत्ता कक्ष समन्वयक डॉ.मिर्झा बेग आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

महाविद्यालयातील नॅक तपासणीसाठी डॉ.ए.टी.शिंदे, डॉ.एस.बी.देशमुख, डॉ.बी.एल.घायाळ, डॉ.एफ.एम.सौदागर, डॉ.एन.के.वाघमारे, डॉ.शंकर विभुते, डॉ.जी.एस.पाटील, डॉ.एस.बी.मिर्झा, डॉ.आर.जी.मेटकर, डॉ.यु.ई.बैस, डॉ.आर.जी.पवळे, डॉ.एम.व्ही.लोखंडे, डॉ.के.आर.सोळुंके, डॉ.डी.बी.कदम, डॉ.एस.जी.तुगावकर, डॉ.व्ही.बी.मस्के, डॉ.बी.एन.पस्तापुरे,डॉ.एच.एस.मोहोकार,डॉ.एल.टी.काळे,डॉ.हनुमंतभोपाळेडॉ.जी.एस.भोपाळकर,प्रा.आर.बीपाटील,प्रा.अपस्तंभ,प्रा.जाकोरे,प्रा.काझीमॅडम,कार्यालयीनप्रबंधकश्री.वडवळे,डॉ.नितापतंगे,प्रकाशहंबर्डे,संजयकळगावकर,विठ्ठलपुयड,संजयएलसटवार,श्री.पवार,अतिक,राजेश शिंदे.. आदींनी परिश्रम घेतले.

Share This Article
error: Content is protected !!