जिल्यात मा.अशोकराव चव्हाण यांच्या आचानक भाजप प्रवेशाने नांदेड येथील सर्व सामान्य कार्यकर्ता पेटून उठला आहे.
त्यांना हा निर्णय मान्य नाही काँग्रेस च्या सर्व सामान्य कार्यकर्ता मध्ये या जिल्ह्यात शहरात पुन्हा काँग्रेस उभ करण्याचे काम हा कार्यकर्ता करेल अनेक लोक दडपणाखाली होते त्यांना कसल्याही प्रकारे काम करू दिल्या जात नव्हते पक्षाची संघटना उभी केली जाऊदेत नव्हती पक्षाची कार्यकारणी जाहीर करू दिल्या जात नव्हती पक्षाचे निर्णय घेऊ दिल्या जात नव्हते अशा प्रकरचे दडपण होत. हे सगळं दडपण बाजुला फेकुन हे सगळे कार्यकर्ते समोर आलेले आहेत.
आम्ही पुन्हा पक्ष उभारण्यासाठी सर्व सामान्य कार्यकर्ता,शेतकरी वर्ग,मागासवर्गीय,मुस्लिम वर्ग,भटका वर्ग काँग्रेस बरोबर राहणार आहे. पुन्हा नांदेड मध्ये काँग्रेसला गत वैभव प्राप्त होईल असे ही ते यावेळी म्हणाले आणि लवकरच प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी आणि शेतकरी यांचा एक लाख लोकांचा मेळा आम्ही घेणार असल्याचे मधुकर माळी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली यावेळी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष जे पी पाटील, प्रदेश सरचिटणीस नंदकुमार कुंभार,विजय राऊत,काँग्रेस जिल्हाअध्यक्ष गोविंद पाटील नागेलीकर,महानगर अध्यक्ष अब्दुल सत्तार यांची उपस्थिती होते