शांताबाई तलवारेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन…
मंत्रालयासमोर आमरण उपोषणास बसणार
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड –जिल्यातील देगलूर तालुक्या मधील टाकळी (जहांगीर) येथील दलित विधवा महिलेच्या हक्काच्या शेतजमिनीवर अतिक्रमण करून सवर्ण लोकांनी कब्जा मिळविला आहे. वारंवार प्रशासनाला तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याने या महिलेने थेट मुंबई गाठून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.
परिणामी योग्य दखल न घेतल्यास मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनकर्त्या शांताबाई लक्ष्मण तलवारे यांनी दिला आहे.
टाकळी जहांगीर येथील शांताबाई लक्ष्मण तलवारे यांच्या वडिलोपार्जित मिळकत गट नं. 91 मधील दोन एकर जमिनीवर गावातील गुंडप्रवर्तीचे लोक तुळशिराम व्यंकटरेड्डी बोपावाड, हणमंत इरप्पा मुंडकर,नागनाथ बसवंत नलबले,जस्मा शंकर अप्पा स्वामी,शिवराम ईरप्पा नलबले,गोपाळ चंद्ररेड्डी गोपावाड,माधव भुमण्णा परतवाड,संजय शिवलिग शेटकर,बसवंत माधव पाटील, गुंडरेड्डी हणमंल्नू गुडशेवाड, बापूराव देसाई, वाल्मिक ऋषी झेंडा,संतू रेड्डी कापसे,यादव गायकवाड,तुळशिराम गायकवाड,नबले नागूराव, माधव तेलंगे,वैजनाथ नालबाले व ईतर व्यक्तीनी मिळुन अतिक्रमण करून आपला ताबा मिळवून गावचा लफडेबाज पुढारी व आणि एका चांगल्या बाईचे पतिराज यांच्या जीवावर दडपशाही करत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी आता दलित संघटनांनी मोठ्या आंदोलन करण्याच्या परिसरात आहे.
सन 1978 ते 1982 काळापासून आलेल्या ग्रामसेवक यांनी नमुना नं. 8 ला नोंद करुन घर बांधण्याचे परवानगी दिली व मागील 1999 ते 2000 मध्ये तलाठी व ग्रामसेवक,मंडळ अधिकारी,मुख्याध्यापक, ग्रामपंचायत सरपंच यांच्या संगनमताने गावातील सुवर्ण लोकाकडून पैसे खाऊन प्लॉट, शाळा,पाण्याची टाकी व किचन रुमचे अतिक्रमण करुन बांधकाम केले शाळा,पाण्याची टाकी व किचन रुम,अंगणवाडी म्हणून इमारत बांधले व बांधण्यास परवानगी देणाऱ्या अधिकारी यांच्यावर चोकशी करुन माझ्या जमीनीचा अतिक्रमण करुन बांधकाम करणा-या अधिकान्यावर सरपंच कर्मचा-यावर कायदेशिररित्या कार्यवाही करण्यात यावी असेही निवेदनकर्त्यांनी आरोप केला आहे.
तर 2000 ते 2023 चे ग्रामसेवक बोगस कागदपत्राच्या सहाय्याने प्लॉट व शाळा पाण्याची टाकी,किचन रुम नमुना नं.8 ला लावले असू म्हणून ते नमुना नं.8 कशाच्या आधारे लावले? तो शपथपत्र खरा आहे की,याची सुध्दा छाननी झाली पाहिजे व त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे.खोटे कागदपत्र पोलिसांनी ताब्यात घेतली पाहिजे त्या आधारे गुन्हा नोंद करण्यात यावी अशी मागणी तलवारे यांनी निवेदनात केली आहे. योग्य कार्यवाही न झाल्यास मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा इशारा तलवारे यांनी दिला आहे.