नायगाव प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नायगाव – महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यस्तरीय शाळांमध्ये स्पर्धा आयोजित करून नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 90 शाळांनी या उपक्रमात सहभाग घेतलेला होता. विविध 30 प्रकारचे उपक्रम शाळेने आयोजित करून प्रत्यक्ष नियोजन, आयोजन व अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने विविध उपक्रम शाळेने राबवले. यात शालेय रंगरंगोटी वर्ग व शाळा सजावट ,परसबाग, शालेय परिसरात पर्यावरण पूरक वृक्षारोपण, बाल संसद, बाल वाचनालय, आरोग्य विषयक विविध शिबिरे, व्यवसाय मार्गदर्शन शिबिरे, विद्यार्थी बचत बँक, राष्ट्रीय एकात्मतेस पूरक उपक्रम, नवभारत साक्षरता अभियानात शाळेचा सहभाग,प्रधानमंत्री पोषण आहार योजनेत विद्यार्थ्यांचा सहभाग, स्काऊट गाईड मेळावा सहभाग, माजी विद्यार्थी मेळावा यासारख्या अनेक उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद घेतला.
सुसज्ज व प्रशस्त इमारत, प्रत्येक वर्ग डिजिटल, विद्युतीकरण, आकर्षक व बोलकी शालेय रंगरंगोटी म्हणून ही शाळा तालुक्याचे लक्ष वेधून घेत आहे. कमी कालावधीत उपक्रमशील व आदर्श शाळा म्हणून शाळेचे कुशल व उपक्रमशील मुख्याध्यापक उत्तम गायकवाड यांनी व त्यांचे सहकारी शिक्षिक सौ स्वाती अडबलवार व सहशिक्षक भारत घोरपडे यांनी अथक परिश्रम घेतले. आणि तालुकास्तरीय तीन लाखाचे बक्षीस पटकावले.
यासाठी त्यांना नायगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी नंदकुमार काकडे साहेब व केंद्रप्रमुख चिखलवाड आर.एन. यांचेही मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी माननीय वाजे साहेब यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
या शाळेच्या यशात सरपंच सौ अश्विनीताई अशोक मोरे उपसरपंच सुनील मोरे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्ता मोरे , ग्रामसेवक मुदखेडे साहेब व सर्व व्यवस्थापन समिती सदस्य व समस्त शिक्षण प्रेमी गावकऱ्यांचा मोलाचा वाटा आहे.