२४ हजाराची लाच घेताना ग्रामसेवक चतुरभूज

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड –जिल्यातील मुखेड तालुक्या मधील सांगवी भादे सज्जाचे ग्रामसेवक कृष्णा रामदिनवार २४ हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडल्याची घटना दि.२६ रोजी सांयकाळी ५.३० वाजताच्या सुमारास मुखेड शहरातील लातूर-मुखेड महामार्गावरील राजेश धाबा येथे घडली. यातील तक्रारदार यांचे सांगवी भादेव ता.मुखेड जि.नांदेड येथील वार्ड क्रं.१ मधिल दलीतवस्तीमधिल सांडपाण्याच्या नालीचे कामासाठी ५ लक्ष रुपये निधी मंजूर झाला होता.

 

मंजूर झालेल्या निधीमधुन तक्रारदार यांनी दलीतवस्तीमधिल झालेल्या नालीच्या कामाचे बिल मिळाल्यानंतर यातील ग्रामसेवक कृष्णा रामदिनवार यांनी ५% म्हणजे २५ हजार रुपये त्यांना द्यावे लागतील असे म्हणाले.सदरची रक्कम २५ हजार रुपये ही लाच असल्याची तक्रारदार यांना खाञी झाल्याने त्यांना ती देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नांदेड यांना तक्रार दिली. दि.२६ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने तक्रारदार यांना लाच मागणी पडताळणीसाठी पाठविले असता आरोपी लोकसेवक ग्रामसेवक कृष्णा रामदिनवार यांनी पंचासमक्ष २५ हजाराची मागणी करुन तडजोडीअंती २४ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.त्यावरुन लोकसेवक यांनी पंचासमक्ष २४ हजार रुपये मुखेड शहरातील लातूर-मुखेड महामार्गावरील राजेश बार-अँड रेष्टाॕरंट येथे लाच स्वीकारली असता त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांनी रंगेहात पकडले.या घटनेमुळे तालुक्यातील लाच घेणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. तर पंचायत समितीमध्ये यापुर्वी एका कर्मचाऱ्यास रंगेहात पकडले होते.पंचायत समिती कार्यालय अंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असुन कर्मचाऱ्यांना गटविकास अधिकारी यांचे वचक नसल्याचे नागरीकांतुन बोलले जात आहे.

कृष्णा रामदिनवार यांना ताब्यात घेण्यात आले.पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नांदेड हे करीत आहेत.हा सापळा अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षञ , नांदेडचे पोलीस अधिक्षक डॉ .राजकुमार शिंदे,नांदेड आप्पर पोलीस अधिक्षक रमेशकुमार स्वामी,पर्यवेक्षण अधिकारी राजंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक जमिर नाईक,सपोउपनि गजेंद्र मांजरमकर ,पोह किरण कणसे,पोकाॕ ईश्वर जाधव चापोना प्रकाश मामुलवार यांनी यशस्वी केला.

Share This Article
error: Content is protected !!