नांदेड जिल्हा प्रतिनिधी. गोविंद चिखलवाड
नांदेड – येथील खोब्रागडे नगर शासकीय गोदाम लगत व्यापारी संकुल बांधकाम त्वरित बंद करून दलित वस्तीला सध्या असलेले 10 फुटाचा मेन रोड व गल्ली लगतचा सध्याचा 3 फुटाचा रस्ता 30 फुटाचा करून त्वरित विस्तार करावा. बुलडोजर लावून पूर्ण खोब्रागडे नगर पाडून उध्वस्त करतो आणि महिलांना अवाछ भाषेमध्ये शिवीगाळ करून धमक्या देणाऱ्या बिल्डर नागडा यांच्यावर त्वरित कारवाई करून गुन्हा नोंदवावा .
खोब्रागडे नगर एक व दोन नगरात रस्ते व नाले पिण्याचे पाणी व ड्रेनेज लाईन सर्व मूलभूत सोय सुविधा त्वरीत करून द्यावेत या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे असा इशाराही दिला आहे. या आंदोलनात त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून त्यांनी कॉन्ट्रॅक्टर चा धिकार असो ,रस्ता आमच्या हकाचा नाही कुणाच्या बापाचा, मुर्दाबाद मुर्दाबाद हुकूमशाही मुर्दाबाद ,प्रकाश आंबेडकर यांचा विजय असो,सर्व मूलभूत सुविधा मिळाल्याचं पाहिजे अशा प्रकारे घोषणाबाजी करत रॅली काढण्यात आली.